Home > Max Political > रितेश देशमुख वडीलांबद्दल बोलताना झाला भावूक..!

रितेश देशमुख वडीलांबद्दल बोलताना झाला भावूक..!

रितेश देशमुख वडीलांबद्दल बोलताना झाला भावूक..!
X

लातूरमध्ये विलासराव सहकार कारखान्यात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचं अनावरण पार पडलं. या कार्यक्रम प्रसंगी बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख उपस्थित होता. यावेळी रितेश देशमुखने व्यासपिठावर बोलताना आपल्या वडिलांच्या कार्य कर्तृत्वाचा उल्लेख करत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम केलं.


रितेश म्हणाला की, विलासराव देशमुख साहेबांनी कधीही कुणावर व्यक्तीगत टीका केली नाही, ते आपल्या सहकाऱ्यासोबत नेहमीच आदराने वागायचे, आज लातूरमध्ये विलासराव सहकार कारखान्यात देशमुख साहेबांचा भव्य पुतळा उभारण्यात आला. त्या पुतळ्याकडे बघुन आपण प्रेरणा घेतली पहिजे. केवळ एक राजकीय नेता म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून त्यांच्याकडून बरंच काही शिकलं पाहिजे. आज साहेबांना जाऊन १२ वर्षे झाली. असं म्हणत रितेश देशमुख भावूक झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले. यावेळी भाऊ अमित देशमुख देशमुखने रितेशला सावरत भाषण पुढे सुरू ठेवण्यास पाठबळ दिले.


यावेळी रिेतेश बोलताना असंही म्हणाला की, वडिलांच्या नंतर काकांनी आम्हाला साथ दिली म्हणून मी काकांवर खूप प्रेम करतो. काका पुतण्याच्या प्रेमाबद्दलही भाष्य केलं.

Updated : 18 Feb 2024 12:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top