Top
Home > Max Political > रिपब्लिकच्या अडचणीत वाढ: आरोपींची शपथेवर वाहिन्या पाहण्यासाठी पैसे दिल्याची कबुली

रिपब्लिकच्या अडचणीत वाढ: आरोपींची शपथेवर वाहिन्या पाहण्यासाठी पैसे दिल्याची कबुली

टिआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशीची व्याप्ती वाढविली असून चार आरोपींनी शपथेवर रिपब्लिक टिव्ही पाहण्यासाठी पैसे घेऊन वाटल्याची कबुली दिली आहे. या कबुलीजबावामुळे पोलिसांची बाजू मजबूत झाली असून हे आरोपी आता वाहिन्यांच्या विरोधात पोलिस प्रकरणात त्यांना साक्षीदार म्हणून उपयोगी ठरणार आहेत. रिपब्लिक टीव्हीने त्यांना पैसे दिल्याचा जबाब तिघा साक्षीदारांनी दिला आहे

रिपब्लिकच्या अडचणीत वाढ:  आरोपींची शपथेवर वाहिन्या पाहण्यासाठी पैसे दिल्याची कबुली
X

मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देखील जबाब मिळाल्याची पुष्टी केली असून अधिक स्पष्टीकरण देण्यास नकार दिला, असे सांगून की चौकशी महत्त्वपूर्ण टप्प्यावर आली आहे आणि या टप्प्यावर काही खुलासा झाल्यास चौकशीला बाधा येईल असे सांगितले. रिपब्लिक टीव्ही, बॉक्स सिनेमा आणि फक्त मराठी चॅनेलच्या टिआरपी घोटाळ्याची चौकशी गुन्हे विभागामार्फत केली जात आहे.

सीआरपीसीच्या कलम 164 च्या खाली साक्षीदारांचे जबाब कोर्टात घेतले असून आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या 5 व्यक्तींपैकी तिघांनी हंसा अ‍ॅनालिसिसच्या एका माजी कर्मचारी या रॅकेटचा एक भाग असल्याचं उघड झालं आहे. ठराविक चॅनेल चालू ठेऊन ते बघण्यासाठी घरोघरी पैसे वाटप होत असल्याचे उघड झाले आहे. ब्रॉडकास्ट व्ह्यूअर्स अ‍ॅनालिसिस काउन्सिलने (बीएआरसी) हंसाला

सर्वेक्षणाचे काम दिले होते. ते. हे कौशल्याने घरातील टीव्ही युनिट विशिष्ट वाहिनी पाहण्यासाठी पैसे देत होते. असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. "हे कबुलीजबाब आमची केस अधिक मजबूत करेल," असे ते पुढे म्हणाले. दरम्यान, सहायक निरीक्षक सचिन वाझे यांनी रिपब्लिक टीव्हीचे वरिष्ठ सरकारी संपादक अभिषेक कपूर यांची गुरुवारी 3 तास चौकशी केली. बुधवारी पोलिसांनी रिपब्लीक वाहिनीचे संपादक निरंजन नारायणस्वामी यांचे जबाब नोंदवले होते.10 ऑक्टोबर रोजी च्या रिपब्लीक वाहीनीच्या कार्यक्रमात एफआयआरची प्रत प्रसारित करण्याबद्दल कपूर यांनाही विचारले गेले होते. सूत्रांनी सांगितले की एफआयआरच्या कॉपी कशी कार्यक्रमात घेतली याविषयी या दोघांनी कोणताही माहीती नसल्याचे सांगितले.

Updated : 2020-10-17T09:26:21+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top