Home > Max Political > दिल्ली हिंसाचार: देशभरातील विरोधी पक्षातील नेत्यांनी काय म्हटलंय?

दिल्ली हिंसाचार: देशभरातील विरोधी पक्षातील नेत्यांनी काय म्हटलंय?

देशभरातील विरोधी पक्षातील नेत्यांनी काय म्हटलंय?

दिल्ली हिंसाचार: देशभरातील विरोधी पक्षातील नेत्यांनी काय म्हटलंय?
X

दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागल्यानंतर राजकीय पटलावर नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून शांततेत आंदोलन करणारे शेतकरी आज आक्रमक का झाले? असा सवाल विरोधी पक्षातील राजकीय नेते सरकारला करत आहेत. या आंदोलनात काही असामाजिक तत्त्व घुसल्याचा दावा शेतकरी नेते करत आहेत. दरम्यान शेतकरी आणि पोलिस यांच्यामध्ये झालेल्या हिंसाचारात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. 

या आंदोलनावर विरोधकांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सर्वांनी हिंसेचा निषेध करत सरकारवर निशाणा साधला आहे.

कोणी काय म्हटलंय?

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन केलं आहे.

"हिंसा कुठल्याही समस्येचं उत्तर नाही. जखम कुणालाही होवो नुकसान आपल्या देशाचचं होणार आहे. देशहितासाठी कृषीविरोधातील कायदे मागे घेण्यात यावेत."

अशी मागणी करत राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन केलं आहे.

तर माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार निशांत साधला आहे. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले..

"जे घडतं आहे त्याचं समर्थन कुणीच करणार नाही. मात्र ते का घडतंय याचा विचार व्हायला हवा. जो शेतकरी बांधव दोन महिने शांततामय आंदोलन करत होता. तो हिंसक का झाला आहे? अजूनही केंद्र सरकारने शहाणपणा दाखवावा. चर्चेत टोकाची भूमिका सोडावी, रास्त मागण्यांचा गांभीर्याने विचार व्हावा. हे केलं नाही आणि बळाचा वापर करून काही करता येईल अशी भूमिका घेऊ नये. पंजाब एकेकाळी अस्वस्थ होता. तो पूर्णपणाने सावरला आहे. पंजाबला अस्वस्थ करण्याचं पातक मोदी सरकारने करू नये.


असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

तिरंग्याचा अपमान सहन करणार नाही, सरकारने ठरवलं असतं तर हिंसा टाळली असती असं म्हणत मोदी सरकार कायदे का रद्द करत नाही? असा सवाल करत मोदी सरकारवर करत आता कोणाचा राजीनामा मागणार असा सवाल मोदी सरकारला केला आहे.



पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन केलं आहे.

"दिल्लीतलं दृश्यं अविश्सनीय. हिंसेचं समर्थन होऊ शकत नाही. शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी जी शिकवण दिली त्याचं नुकसान करणारं वर्तन. शेतकरी नेत्यांनी या हिंसक लोकांना बाहेरचं असल्याचं म्हटलं आहे. ट्रॅक्टर रॅलीला थांबवण्यात आलं आहे. मी सर्व शेतकऱ्यांना दिल्ली शहर सोडून सीमेनजीक येण्याचं आवाहन करतो"

असं अमरिंदर सिंह यांनी म्हटलं आहे.


वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे.

हा कायदा मुळात काँग्रेसचा आहे. एका बाजूला केंद्राने तुमचाच कायदा आणला. तुमचीच भूमिका केंद्र राबवत आहे. मग तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाची बी टीम नाही का?... हा आंदोलनाला दाबण्याचा प्रयत्न तर नाही ना?... तुम्ही महाराष्ट्रातील कायदा रद्द का करत नाही? 'फक्त नौटंकी आणि तमाशा म्हणून तुम्ही या कायद्यांना विरोध करत आहात. असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

आम आदमी पक्षाने दिल्ली येथे झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. केंद्र सरकारने परिस्थिती एवढी चिघळू दिली. हे दुर्देवी आहे.

दोन महिन्यांपासून आंदोलन शांततामय मार्गाने सुरू आहे. शेतकरी नेत्यांनी म्हटलं आहे की आज ज्यांनी हिंसाचार केला ते आंदोलनाचा भाग नाहीत. ही बाहेरची माणसं आहेत. ते कुणीही असोत, हिंसेने आंदोलनाला कमकुवत केलं आहे. इतके दिवस आंदोलन शांततामय आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू होतं .

असं आम आदमी पार्टीने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहिल्याने दिल्लीत आजची दुर्दैवी परिस्थिती उद्भवली, केंद्राचे नवे कायदे भांडवलदार, साठेबाजांच्या फायद्याचे आहेत. फक्त शेतकरीच नाही तर जनतेच्याही विरोधातील आहेत, असा आरोप थोरात यांनी केला आहे.

एकंदरिंत आंदोलनात झालेल्या हिंसेचं कोणीही समर्थन केलं नसलं तरी या हिंसेला विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला जबाबदार धरलं आहे.

Updated : 27 Jan 2021 8:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top