Home > Max Political > लक्षात ठेवा..! महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत : संजय राऊत

लक्षात ठेवा..! महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत : संजय राऊत

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा केवळ कर्नाटकचा नसून, हा दोन राज्यांमधील सीमा प्रश्न आहे. हे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना कळालं पाहिजे. त्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे. कायद्याने काय व्हायचं ते होईलचं, पण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, हे सुद्धा कर्नाटकच्या सरकारने आता विसरू नये अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांच्यावर पलटवार केला आहे. शेतकरी आंदोलनावरही त्यांनी "सरकारला आता यापुढे शेतकऱ्यांना चिरडून टाकायचंय, दडपशाही करायची आहे" असं सांगितलं.

लक्षात ठेवा..! महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत : संजय राऊत
X

मावासीयांच्या पिढय़ान्पिढय़ा कर्नाटक सरकारच्या अत्याचाराला सामोऱ्या जात असून त्याविरुद्ध पूर्वीप्रमाणेच एकजूट दाखविणे आवश्यक आहे. संपूर्ण महाराष्ट्र सीमावासीयांच्या पाठीशी असून न्यायालयात या प्रकरणात ठाम बाजू मांडण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. महाविकास आघाडी सरकार कोणत्याही परिस्थितीत कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राचा प्रदेश पुन्हा राज्यात आणणारच, असा ठाम निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल व्यक्त केला होता.

तसेच एखादा प्रश्न न्यायालयात असेपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवली पाहिजे. परंतु कर्नाटक सरकारने बेळगावचे नामांतर, उपराजधानीचा दर्जा तसेच तेथे विधानसभेची उभारणी करून न्यायालयाचा अवमान करण्याचे काम केले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात सीमावादाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हा भाग केंद्रशासित केला जावा, अशी भूमिकाही ठाकरे यांनी मांडली होती.

त्यावर बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचा भाग आहे, असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले होते. त्यावर असे येडे बरळतच असतात कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांनी जरा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नाचा अभ्यास करावा, अशी घणाणती टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जे सागंतिलं तेयोग्य आहे हा केवळ कर्नाटकचा प्रश्न नाही तर दोन राज्यांच्या सीमांचा प्रश्न आहे.

महाराष्ट्रात आणि मुंबईत कानडी आहेत आम्ही त्यांच्यावर कोणतीही सक्ती केली नाही त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्यांच्या शाळा, संस्था महाराष्ट्रात चालतता अशी मुंबईसारखी परिस्थिती बेळगावमध्ये आहे का? बेळगावमध्ये मराठीचं काय स्थान आहे? असे प्रश्न करतानाच कानडी लोकांना आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जायला सांगत नाही.

आम्ही फक्त कर्नाटक व्याप्त भाग महाराष्ट्रात यावा असं सांगत आहोत. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी एकदा महाराष्ट्रात यावं आणि इथल्या कानडी लोकांशी बोलावं, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

शेतकरी आंदोलन व प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान उफाळलेल्या हिंसाचारावर बोलाताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर आज गंभीर आरोप करत "सरकारला आता यापुढे शेतकऱ्यांना चिरडून टाकायचंय, दडपशाही करायची आहे" असं सांगितलं.

राऊत म्हणाले, "सरकारने एकप्रकारची दडपशाही सुरू केलेली आहे. लाल किल्ल्यावर शेतकरी घुसले असं म्हणत आहेत. ते खरोखर शेतकरी होते? की कुणीतरी फूस लावून, जे आता फोटो आलेले आहेत, पंतप्रधानांबरोबर किंवा भाजपाच्या नेत्यांबरोबर जे कुणी सिद्धू वैगरे लोकं आहेत. ते कोण आहेत? कुणाचे आहेत? त्याचा तपास अगोदर करा. ते कुठं फरार झालेले आहेत? पण सरकारला आता यापुढे शेतकऱ्यांना चिरडून टाकायचं आहे. दडपशाही करायची आहे आणि त्याचाच एक कारस्थानाचा भाग म्हणून आंदोलनात फूट पाडून त्यातील एक गट जो भाजपाच्या नेतृत्वाखाली आतमध्ये घुसला होता ते लाल किल्ल्यावर गेले. त्यांनी गदारोळ निर्माण केला आणि आज जे सगळं चित्र निर्माण झालं आहे, परत की आंदोलनात फूट पडली. काही नेत्यांवरती गुन्हे दाखल केले. शेतकऱ्यांना पाहून घेऊची भाषा पोलिसांकडून सुरू आहे. ठीक आहे, करून घ्या. संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. पहिल्या दिवसांपासून या सरकारला सर्व प्रश्नांचा उत्तर द्यावी लागतील."

Updated : 28 Jan 2021 7:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top