Home > Max Political > अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर रावसाहेब दानवे यांची सूचक प्रतिक्रिया

अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर रावसाहेब दानवे यांची सूचक प्रतिक्रिया

अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर रावसाहेब दानवे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर रावसाहेब दानवे यांची सूचक प्रतिक्रिया
X

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार (ajit pawar) भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच अजित पवार यांनी पुणे येथे सकाळ (sakal) माध्यम समूहाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे की, अजित पवार हे धडाडीचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. गुवाहाटीला (Guwahati) असताना आमदारांना कोणतीही सरकारी मदत मिळाली नाही, हे सुद्धा दानवे यांनी स्पष्ट केलं.भाजपने राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas aghadi) सरकार पाडलं नसून हेच पायात पाय गुंतून पडले. त्यानंतरच एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना भाजपने पाठिंबा दिल्याचं दानवे यांनी सांगितले.

अजित पवार यांच्याविषयी चर्चांना उधाण


गेल्या काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यातच अजित पवार दोन वेळा नॉट रिचेबल (Ajit pawar not reachable) झाले होते. त्यापार्श्वूमीवर अजित पवार यांच्यासोबत ४० आमदारांचे समर्थन असल्याचीही चर्चा आहे. मात्र अजित पवार यांनी मी शेवटचा श्वास असेपर्यंत राष्ट्रवादीत (NCP) राहणार असल्याचे सांगत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. यानंतर अजित पवार यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री होण्याबाबत इच्छा व्यक्त केली. त्यानंतर रावसाहेब दानवे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार मुख्यमंत्री होण्याबाबत काय आहेत शक्यता (Possibility of Ajit pawar become CM)

१) अजित पवार सध्या विरोधी पक्षनेते आहेत. त्यातच अजित पवार यांचे राष्ट्रवादी पक्षात वजन असल्याने २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने बहुमत मिळवल्यास अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात.

२) सर्वोच्च न्यायालयाचा (supreme court) निर्णय एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या विरोधात गेल्यास आणि अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत गेल्यास मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

३) अजित पवार सध्या भाजपसोबत गेल्यास त्यांना आधी उपमुख्यमंत्री केले जाऊ शकते. त्यामुळे आगामी काळात राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर २०२४ च्या निवडणुकीत अजित पवार यांनी दमदार कामगिरी करून काँग्रेस भुईसपाट करण्यात यश मिळवल्यास अजित पवार यांना मुख्यमंत्री केले जाऊ शकते.

एकंदर अजित पवार चर्चेच्या केंद्रस्थानी असतानाच मुख्यमंत्री होण्याबाबत वक्तव्य सुरू आहेत. त्यामुळे अजित पवार यांची इच्छा पूर्ण होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Updated : 22 April 2023 3:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top