Home > Max Political > रविंद्र वायकर करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; उध्दव ठाकरेंना मोठा धक्का

रविंद्र वायकर करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; उध्दव ठाकरेंना मोठा धक्का

रविंद्र वायकर करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; उध्दव ठाकरेंना मोठा धक्का
X

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव बाळासाहेव ठाकरे यांना आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा धक्का बसला आहे. उध्दव ठाकरे यांच्याशी कौटुंबिक संबंध असलेले नेते आणि आमदार रवींद्र वायकर) हे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडणार आहे. रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे आमदार आहेत. रवींद्र वायकर हे लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांना तयारीत राहण्याचे आदेश दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

जोगेश्वरीतील कथित घोटाळ्याचे आरोप रवींद्र वायकर यांच्यावर आहेत. त्यांची ईडीची चौकशीही सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच ट्विट करुन, रवींद्र वायकर यांना ईडी धमकावत असल्याचं म्हटलं होतं. तसंच रवींद्र वायकर यांना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी दबाव असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं.


त्या भेटीनंतर झाला निर्णय

जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी ईडीच्या रडारवर असलेले ठाकरे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी रवींद्र वायकर हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील आणखी एक आमदार शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा होती. या आमदाराने एकनाथ शिंदे यांची गुप्तपणे भेट घेतल्याचीही चर्चा होती. मात्र, हा आमदार नेमका कोण, हे समजू शकले नव्हते. मात्र, आता आमदार रवींद्र वायकर असल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी ईडीने आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात रवींद्र वायकर यांची चौकशी केली होती. गेल्या महिन्यात रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाडही टाकली होती. त्यानंतर आता रवींद्र वायकर आता शिंदे गटात प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रवींद्र वायकर यांच्यासोबत स्थानिक शिवसैनिकही शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. वायकर यांनी सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांना तयारीत राहण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे आणि रविंद्र वायकर यांच्यात काय झाली चर्चा?

रवींद्र वायकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काही दिवसांपूर्वी गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. या बैठकीत रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही मुळचे शिवसैनिक आहोत, धनुष्यबाणाचे पाईक आहोत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आम्हाला तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायचे आहे, असे वायकरांनी एकनाथ शिंदे यांना सांगितल्याचे समजते.

रविंद्र वायकर यांच्याबद्दल थोडक्यात माहिती (Who is Ravindra Waikar)

1992 मध्ये रवींद्र वायकर जोगेश्वरी भागातून पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेवर निवडून गेले. 2006-2010 या काळात वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीनवेळा जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून वायकर आमदार म्हणून निवडून आले. महाविकास आघाडी सरकारमध्ये रवींद्र वायकर यांच्याकडे गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे राज्यमंत्रीपदाची धुरा होती. त्यानंतर 2019च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये वायकर गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्री होते

Updated : 8 Feb 2024 3:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top