Home > News Update > आम्ही आंदोलन संपवत आहोत, राणा दाम्पत्याची माघार

आम्ही आंदोलन संपवत आहोत, राणा दाम्पत्याची माघार

आम्ही आंदोलन संपवत आहोत, राणा दाम्पत्याची माघार
X

गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालिसा पठनावरुन महाराष्ट्रात राजकिय नाट्य सुरू आहे.रवी राणा आणि नवनीत राणा मातोश्रीवर जाऊन पठन करणार या घोषणा केल्यापासून शिवसैनिकांकडून प्रखर विरोध करण्यात आला होता.आता राणा दाम्पत्यांनी मातोश्रीवर जाण्याचा निर्णय रद्द केला असून आंदोलन संपवत असल्याचं जाहीर केलं

२३ एप्रिल रोजी आपण मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा वाचणार असल्याचं राणा दाम्पत्यांनी जाहीर केलं होतं. मात्र आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणा दाम्पत्यानं आंदोलन थांबवण्याचा निर्णय जाहीर केला

आहे.राज्यात पोलिसांना , सामान्य जनतेला त्रास होऊ नये आणि उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रस्तावित मुंबई दौरा रद्द होऊ नये यासाठी आम्ही आंदोलन थांबवत आहोत, असं रवी राणा यांनी सांगितलं

महाराष्ट्रात कुणाला घाबरण्याचं काम नाही. कुणाच्याही धमक्यांना घाबरण्याचं काम नाही. आम्ही कुठल्या दबावालाही बळी पडणारे लोक नाही. आम्ही लोकांची सेवा करून आणि विधानभवन आणि लोकसभेत पोहोचलो आहोत. आज आम्ही ठरवलंय की पूर्ण महाराष्ट्रात पोलीस, जनतेला त्रास होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जरी हनुमान चालीसेचा अवमान केला असला तरी सगळ्यांना होणारा त्रास पाहाता आमचं आंदोलन आम्ही संपवत आहोत. असं रवी राणा यांनी स्पष्ट केलं.

यावेळी बोलताना रावी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आरोप केले,मातोश्रीवर जाणार तोच सकाळी पोलिसांनी घरी डिटेन केलं.शिवसैनिकांकडून घरी हल्ला झाला.दगडफेक केली गेली.राणा दाम्पत्यांना मारा असा आदेशच मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना दिला असावा.राज्याची कायदा-सुव्यवस्था मुख्यमंत्रीच बिघडवत असतील,तर हे राज्याचं दुर्भाग्य आहे. असं रवी राणा म्हणाले.

Updated : 23 April 2022 11:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top