Home > Max Political > SanjayaRaut ना ठरवले गवळी गँगचा शूटर; फोन टॅप करताना रश्मी शुक्लांची शक्कल‌

SanjayaRaut ना ठरवले गवळी गँगचा शूटर; फोन टॅप करताना रश्मी शुक्लांची शक्कल‌

PhoneTapping प्रकरणातील नवनवे खुलासे आता चार्जशीटच्या माध्यमातून पुढे येत आहेत.आरोपपत्रात संजय राऊत यांचा क्रमांक गवळी गँगमधील संतोष रहाटेच्या नावाने टॅप होत असल्याची माहिती उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

SanjayaRaut ना ठरवले गवळी गँगचा शूटर; फोन टॅप करताना रश्मी शुक्लांची शक्कल‌
X


फोन टॅपिंग प्रकरणात संजय राऊतांचा यांचा मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवला होता. या प्रकरणात सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये धक्कादाय़क माहिती समोर आली आहे. तत्कालीन राज्य गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुख रश्मी शुक्ला यांनी संजय राऊत, एकनाथ खडसे यांचे फोन कॉल्स टॅप केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात मविआ सरकारच्या नेत्यांकडून पुरावे देखील सादर करण्यात आले आहेत.

रश्मी शुक्लांना फोन टॅप होत असल्याची माहिती होती, असा वकिलांनी आरोप केला आहे. शुक्ला यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात संजय राऊत यांचा क्रमांक गवळी गँगमधील संतोष रहाटेच्या नावाने टॅप होत असल्याची माहिती आहे. शुक्ला यांना काही अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली. मात्र त्यांनी जाणूनबूजून दुर्लक्ष केलं, असं आरोपपत्रात लिहिण्यात आलं आहे.

मविआ सरकारच्या सत्ता स्थापनेच्या काळात संजय राऊत, एकनाथ खडसे यांचे फोन टॅप झाल्याचा समोर आले होते. या प्रकरणी 2 मार्च रोजी कुलाबा पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी संजय राऊत याच्यासोबत नेमकं काय झालं होतं याबद्दल माहिती घेण्यासाठी हा जबाब नोंदवण्यात आला. एकनाथ खडसेंचा जबाब नोदवल्यानंतर त्यातून बरीच नवीन माहिती मिळाली होती, तशीच वेगळी माहिती गोळा करण्याचा मुंबई पोलीस प्रयत्न करत आहेत. यापूर्वी एकनाथ खडसे यांचा स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं आहे, तर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला महाराष्ट्र पोलिसांच्या राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना हा फोन टॅपिंगचा प्रकार झाला. दरम्यान अतिरिक्त पोलिस आयुक्त राजीव जैन यांच्या तक्रारीवरून आयपीसीच्या कलम १६५ आणि टेलिग्राफ कायद्याच्या कलम २६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन असा दिलासा दिल्यामुळे सध्याच्या सुरक्षित आहेत. परंतु भाजप विरोधात महाविकास आघाडी असा संघर्ष वाढत असल्याने यापुढील काळात संघर्ष पराकोटीला जातोय का काय ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Updated : 29 April 2022 4:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top