Home > Max Political > राणेंचा अजित पवारांना इशारा...

राणेंचा अजित पवारांना इशारा...

चिंचवडमध्ये अजित पराभव यांनी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्यावर नारायण राणे यांनी माझ्या नादाला नागू नका, नाहीतर पुण्यात येऊन बारा वाजवीन, असा इशाराच राणेंनी अजित पवार यांना दिला आहे.

राणेंचा अजित पवारांना इशारा...
X

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील चिंचवड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर बोचरी टीका केली होती. पवारांच्या या टिकेला नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राणे यांनी थेट अजित पवार यांनी दम देण्याची भाषा करत पुण्यात येऊन बारा वाजवीन, माझ्या नादाला लागू नका, अशा शब्दात सुनावले आहे आहे. अजित पवार यांना बारामतीच्या बाहेर कितीपत राजकारण कळते, हे मला माहित नाही, असा सवाल राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. अजित पवार ज्या प्रकारचा राजकारणी आहे त्या त्याबद्दल बोलू नये, मी सलग सहावेळा निवडून आलो आहे. महिला असेल, पुरूष असेल उमेदवार हा उमेदवार असतो, असेही राणे यावेळी म्हणाले. तर जे लोक काम करतात त्यांचा पक्ष टिकतो, बाकीचे संपून जातात, असा टोलाही त्यांनी कुणचेही नाव न घेता पवार आणि ठाकरे यांना लगावला.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधताना राणे यांनी ठाकरेंकडे काय शिल्लक राहिले आहे? असा प्रश्न उपस्थित केला. ज्याचे आता कुठलेही अस्तित्व राहिलेले नाही. पक्षातून गेलेले लोक आपल्याबद्दल काय म्हणतात, अडीच वर्षात आपण काय केले ते पाहा म्हणावे, असा टोला सुद्धा ठाकरे यांना राणे यांनी लगावला. राणे यांच्यावर टिका करताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी जे शिवसेना (Shiv Sena) सोडून गेले त्यांचे काय हाल झाले ते संपूर्ण राज्याने पाहिलेले आहेत. त्यांचे पुढे राजकारणात काय हाल झाले आहेत. ते सुद्धा सर्वांनी पाहिलेले आहे. अशी टिका पवार यांनी केली होती. शिवसेनेला सोडून गेलेले कसे पराभूत झाले हे सांगताना अजित पवार यांनी वांद्रेत बाईनं पाडलं होत, असे म्हणाले होते. वांद्रे पोट निवडणुकीत २०१५ मध्ये काँग्रेसचे (Congress) उमेदवार नारायण राणे यांचा शिवसेनेच्या तृप्ती सावंत (Tripti Sawant) यांनी पराभव केला होते. हे राणे विसरले की काय? असा टोला पवारांनी यावेळी लागवला होता. बाईनं पाडलं म्हणच राणेंना अजित पवार यांनी डिवचले होते. त्यावर नारायण राणे यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली.

Updated : 25 Feb 2023 2:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top