Home > Max Political > राणेंचा खोटेपणा उघड, पोलिसांची न्यायालयात माहिती

राणेंचा खोटेपणा उघड, पोलिसांची न्यायालयात माहिती

राणेंचा खोटेपणा उघड, पोलिसांची न्यायालयात माहिती
X

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सालियन कुटूंबियांची बदनामी केल्याच्या कारणावरून राणे यांच्या विरोधात मालवणी पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहिले होते. त्यावेळी नारायण राणे यांची सात तास चौकशी सुरू होती. त्यावेळी मी गृहमंत्री अमित शहा यांना फोन केला तेव्हा पोलिसांनी मला सोडले, असा दावा नारायण राणे यांनी केला होता. मात्र अशा प्रकारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोन आला नसल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत दिशा सालियनच्या मृत्यूबाबत खळबळजनक वक्तव्य केले होते. तसेच नितेश राणे यांनी दिशा सालियनवर बलात्कार करून तिचा खून केला असल्याचा धक्कादायक आरोप केला होता. त्याप्रकरणी दिशा सालियनच्या आई वडिलांनी महिला आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर महिला आयोगाने मालवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणी नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे मालवणी पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर होते. यावेळी राणे सात तास चौकशीनंतर बाहेर आले. त्यावेळी राणे यांनी पोलिसांवर आरोप केला होता.

राणे म्हणाले होते की, माझी चौकशी न करता मला पोलिसांनी बसवून ठेवले होते. रात्र झाली तरी पोलिसांचा वेळकाढूपणा सुरू होता. शेवटी मी केंद्रीय मंत्री आहे आणि नितेश राणे आमदार आहे, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन केला. त्यानंतर पोलिसांनी आम्हाला सोडले असा आरोप केला होता. मात्र हे सर्व खोटे असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.

पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार आरोपी चौकशीस सहकार्य करीत नव्हते. तर आम्ही सीबीआयला माहिती देऊ असे सांगत होते. तर चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना पोलिसांनी बसवून ठेवले त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन केल्याचा खोटा दावा केला, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. तसेच आरोपीला अटकपुर्व जामीन दिल्यास आरोपी चौकशीला सहकार्य करणार नसल्याची शक्यता पोलिसांनी न्यायालयात वर्तवली. त्यामुळे राणे यांचा खोटेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे.राणेंचा खोटेपणा उघड, पोलिसांची न्यायालयात माहिती

Updated : 11 March 2022 2:13 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top