Home > Max Political > प्रकाश आंबेडकरांच्या या चुकीवर रामदास आठवलेंनी ठेवले बोट

प्रकाश आंबेडकरांच्या या चुकीवर रामदास आठवलेंनी ठेवले बोट

प्रकाश आंबेडकरांच्या या चुकीवर रामदास आठवलेंनी ठेवले बोट
X

राज्य ते देशपातळीवरील राजकारणासंदर्भातील अनेक प्रश्नांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत मॅक्स महाराष्ट्रवरील मुलाखतीत उत्तरे दिली आहेत. या मुलाखतीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे (VBA)अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यासंदर्भात गौप्यस्फोट केला आहे.

प्रकाश आंबेडकरांसंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना रामदास आठवले म्हणाले की "१९९० मध्ये भाजपला आणि शिवसेनेला हरवायचं असेल तर काँग्रेससोबत जायला हवं हे मत मांडत मी ऐक्याची भूमिका घेतली होती. शरद पवार(Sharad Pawar ) त्यावेळी मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांच्याकडे अर्ध्यापेक्षा जास्त सत्ता मागीतली असती तर रिपाइंचे(RPI) १५ ते १६ जण मंत्री झाले असते. त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी 'चूक' केली. १९९८ मध्ये आम्ही एकत्र येत काँग्रेस सोबत युती केली. त्यापद्धतीनं त्यापूर्वीच म्हणजे १९९० मध्ये काँग्रेस सोबत गेलो असतो तर मोठी सत्ता मिळाली असती. त्यावेळी कदाचित उपमुख्यमंत्री पद प्रकाश आंबेडकरांना मिळालं असतं. पण माझे मत ऐकले नाही. ही प्रकाश आंबेडकर यांची मोठी चूक झाल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील राजकारणात आंबेडकरी समाजाचं नेतृत्व इतर लोकं का स्विकारत नाहीत ? असा सवाल आठवले यांना विचारण्यात आला होता. या पार्श्वभूमिवर बोलत असताना आठवले म्हणाले " माझ्या पक्षात सर्व समाजाची लोकं आहेत. प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यात चांगला प्रयोग केला होता मुस्लिम, ओबीसीना, दलित असा समाज एकत्र घेत अनेक वेळा ते निवडणूकीसाठी उभे राहीले आहेत. त्यांना १ लाख ७० हजारापर्यंत मतदान सुद्धा मिळत होतं. परंतू स्वबळावर लोकसभेत निवडूण आले नाहीत, त्यांचे एक, दोन आमदार निवडूण येतात. जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगर पालिकात ते त्यांचे उमेदवार निवडूण आणतात. हा प्रयोग त्यांना इतर जिल्ह्यात करता आला नाही. २०१९ ला सर्व दुर्लक्षीत उपेक्षीत जातींना प्रकाश आंबेडकरांनी एकत्र आणलं . परंतू आपल्याला निवडणूकीला सामोर जायचं असेल तर सर्व जाती समुदायाला एकत्र आणण्याची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची (Dr. Babasaheb Ambedkar) भूमिका होती त्या भूमिकेप्रमाणे सर्वांसाठी काम केलं पाहीजे. त्याशिवाय आपल्याला निवडूण येता येणार नसल्याचं" वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात बोलता आठवले म्हणाले की " प्रकाश आंबेडकर आणि माझा ग्रुप जर एकत्र आला तर बाकीचे लोक सर्व एकत्र येतील. समाजाचीही आम्ही एकत्र येण्याची भूमिका आहे. १९९० ला प्रकाश आंबेडकर,गवई आणि मी एकत्र होतो. परंतू ती वेळ आता गेली आहे. प्रकाश आंबेडकरांना माझ्याबद्दल काय वाटत माहीत नाही ? असा प्रश्न देखील आठवले यांनी उपस्थित केला आहे. ते पुढे म्हणाले की "जस शिवसेना(Shivsena) राष्ट्रवादी (NCP) मध्ये आरोप-प्रत्यारोप होतायंत तस आमच्यात नाही." सत्ता मिळवण्यासाठी जे करावं लागत आहे त्यासाठी आंबेडकर कमी पडत आहेत. दोघांनी मिळून निर्णय घेतला तर समाजाचा फायदा होईल अस वक्तव्य रामदास आठवले यांनी मॅक्स महाराष्ट्रवरील मुलाखतीत केले आहे.


Updated : 9 Nov 2023 4:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top