Home > Max Political > आता नवा वाद.. म्हणे, राम मंदिराची चळवळ स्वातंत्र्यलढ्यापेक्षा मोठी

आता नवा वाद.. म्हणे, राम मंदिराची चळवळ स्वातंत्र्यलढ्यापेक्षा मोठी

१९४७ मधे मिळालेलं स्वातंत्र भीक होतं, खरं स्वातंत्र्य २०१४ मधे मिळालं असं सागून वाद करणारी अभिनेत्री कंगना राणौतचा वाद क्षमत असताना विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त सरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी राममंदिराची चळळ स्वातंत्र्यसंग्रामापेक्षा मोठी होती,असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

आता नवा वाद.. म्हणे, राम मंदिराची चळवळ स्वातंत्र्यलढ्यापेक्षा मोठी
X

१९४७ मधे मिळालेलं स्वातंत्र भीक होतं, खरं स्वातंत्र्य २०१४ मधे मिळालं असं सागून वाद करणारी अभिनेत्री कंगना राणौतचा वाद क्षमत असताना विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त सरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी राममंदिराची चळळ स्वातंत्र्यसंग्रामापेक्षा मोठी होती,असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

१९४७ साली भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळालं. पण राम मंदिरासाठीच्या चळवळीमुळे आपल्याला धार्मिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य मिळालं. ही स्वातंत्र्य चळवळीपेक्षाही मोठी चळवळ होती, असं सुरेंद्र जैन म्हणाले. ते असंही म्हणाले की राम मंदिरामुळे राम राज्य उभारण्याच्या प्रवासाला सुरवात झाली आहे आणि हे मंदिर जेव्हा बांधून पूर्ण होईल तेव्हा भारताचं नशीब बदलले असेल. ते म्हणाले, सध्याचं शतक हे रामाचंच आहे. मंदिरासाठी दान करण्याची चळवळ ही संपूर्ण देशाला एकत्र बांधून ठेवणारी ठरली आहे. यामुळे हे सिद्ध होतं की फक्त राम या देशाला एक करु शकतो. धर्मनिरपेक्ष राजकारणाने देश दुभंगलाच आहे असंही जैन यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त सरचिटणीस अरुण कुमार यांच्या सब के राम या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान रविवारी जैन बोलत होते. ते असंही म्हणाले की, राम मंदिराच्या चळवळीमुळे हिंदू खडबडून जागे झाले आहेत. ही चळवळ हिंदूसाठी आत्मसाक्षात्कार घडवणारी ठरली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त सरचिटणीस अरुण कुमार म्हणाले, हिंदुत्वाची भावना क्षीण होत चालली आहे असे म्हणणाऱ्यांच्या शंकांचे उत्तर राम मंदिरासाठी मिळालेल्या देणग्यांमुळे मिळाले आहे. राम मंदिर आंदोलनामुळे हिंदू समाजाला आत्मसाक्षात्कार झाला आहे. याने हिंदू समाजाला जागृत केले. आंदोलन हे प्रतिक्रियेचा परिणाम नसून हिंदूंच्या बांधिलकीचा परिणाम आहे.

अभिनेत्री कंगना राणौत हिनं १९४७ मधे मिळालेलं स्वातंत्र्य भीक होतं खरं स्वातंत्र्य २०१४ मधे मिळालं असं सागून यापूर्वी वाद केला होता. राममंदीराच्या या वक्तव्यावरुन आता पुन्हा नवा वाद तयार होणार आहे.

Updated : 13 Dec 2021 4:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top