Home > Max Political > रक्षा खडसेंना राष्ट्रवादीत येण्याचा आग्रह धरला होता, मात्र त्यांनी नकार दिला – एकनाथ खडसे

रक्षा खडसेंना राष्ट्रवादीत येण्याचा आग्रह धरला होता, मात्र त्यांनी नकार दिला – एकनाथ खडसे

रक्षा खडसेंना राष्ट्रवादीत येण्याचा आग्रह धरला होता, मात्र त्यांनी नकार दिला – एकनाथ खडसे
X

रावेर लोकसभा मतदारसंघातून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होण्याची शक्यता आहे. विद्यमान भाजप खासदार रक्षा खडसे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांचे सासरे एकनाथ खडसे निवडणूक लढवतील, अशी शक्यता आहे. यासर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मॅक्स महाराष्ट्रचे विशेष प्रतिनिधी संतोष सोनवणे यांनी एकनाथ खडसेंसोबत एक्सक्लुसिव बातचीत केलीय. यामध्ये खडसेंनी अनेक धक्कादायक बाबी स्पष्ट केल्या आहेत.

रावेर लोकसभेची संभाव्य लढाई ही सासरे विरूद्ध सून अशी नाही. तर ती राष्ट्रवादी विरूद्ध भाजप अशी आहे, असं स्पष्ट मतच राष्ट्रवादीचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं. भाजपला रामराम केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसनंही खडसेंना विधानपरिषदेवर पाठवलं. त्यानंतर रावेर लोकसभेच्या खासदार तथा एकनाथ ख़डसे यांच्या सून रक्षा खडसे यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्यावर एकनाथ खडसेंनीच या मुलाखतीत खुलासा केला. ते म्हणाले,” रक्षा खडसेंना मी राष्ट्रवादीत येण्याविषयी आग्रह केला होता. मात्र, त्यांनी नकार दिला असा गौप्यस्फोटचं एकनाथ खडसे यांनी केलाय.

खडसे परिवार वादावर कोणाला बोलण्याचा अधिकार नाही. अनेक नेत्यांची मुलं आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे त्यांचा मुलगा आमदार आहे. गिरीश महाजन यांच्या पत्नी अनेक वर्ष नगराध्यक्षा आहेत. असं म्हणतं एकनाथ खडसेंनी परिवार वादाच समर्थन केलंय

मोदींची लाट 2014 आणि 2019 सारखी राहिली नाही. ती आता ओसरली आहे. India आघाडी प्रामाणिकपणे लढली तर भाजपला पराभव पत्करावा लागेल, अशी परिस्थिती देशात आहे, असं भाकीत राष्ट्रवादीचे नेते, आमदार एकनाथ खडसेंनी केलीय.

Updated : 15 Sep 2023 2:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top