Home > Max Political > महिला आरक्षणाच्या बिलासोबत राजीव गांधी यांचं स्वप्न होणार पूर्ण- सोनिया गांधी यांचं वक्तव्य

महिला आरक्षणाच्या बिलासोबत राजीव गांधी यांचं स्वप्न होणार पूर्ण- सोनिया गांधी यांचं वक्तव्य

केंद्र सरकारने लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मांडले आहे. या विधेयकाला सोनिया गांधी यांनी पाठींबा दर्शवला. मात्र काही चिंताही व्यक्त केल्या आहेत. याबरोबरच या बिलासोबत राजीव गांधी यांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचा विश्वास सोनिया गांधी यांनी व्यक्त केला.

महिला आरक्षणाच्या बिलासोबत राजीव गांधी यांचं स्वप्न होणार पूर्ण- सोनिया गांधी यांचं वक्तव्य
X

केंद्र सरकारने मांडलेल्या महिला आरक्षण विधेयकावर सोनिया गांधी यांनी आपलं मत मांडलं. यावेळी केलेल्या भाषणात सोनिया गांधी यांनी म्हटले की, महिला आरक्षण विधेयकासह राजीव गांधी यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

यावेळी बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या, धुराने भरलेल्या स्वयंपाक घरापासून ते लाईटच्या झगमगाटातील स्टेडियम पर्यंतचा प्रवास मोठा आहे. अखेर तीने तिची मंजित पूर्ण केली. तिने जन्म दिला, तिने परिवार चालवला, तिने पुरुषांमध्ये वेगाने झेप घेतली, त्यानंतर प्रचंड धैर्याने तिने स्वतःला हारवत अखेरच्या क्षणी जिंकण्याचा आनंद घेतला. स्त्रीमध्ये महासागरासारखं धैर्य आहे. स्त्री आपल्या फायद्याचा विचार करत नाही

स्त्री नदी सारखं सगळ्यांसाठी काम केलं आहे.

कठीण काळात हिमालयासारखं ठाम राहिली.

स्त्री च्या धैर्याचा अंदाज लावणे अशक्य आहे.

आमच्या देशाची आई आहे स्त्री

स्त्रीने आम्हाला जन्मच दिला नाही

आपल्या बुद्धीने विचार करून बुद्धीमान आणि शक्तीशाली बनवलं आहे.

स्वातंत्र्याची लढाई आणि नव्या भारताच्या उभारणीत महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढली, असं मत सोनिया गांधी यांनी व्यक्त केले. त्याबरोबरच सरोजिनी नायडू, सुचेता कृपालानी, विजयालक्ष्मी पंडित, राजकुमारी अमृत कौर, अरुणा असफ अली यांचाही केला उल्लेख केला. तसेच महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नांना जमिनीवर उतरून स्त्रीयांनी पूर्णत्वाकडे नेलं, असंही सोनिया गांधी म्हणाल्या.

पुढे बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की, पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजीव गांधी यांनीच महिला आरक्षणाचे बिल आणले होते. ते राज्यसभेत सात मतं कमी पडल्याने मंजूर झाले नव्हते. त्यानंतर पी. व्ही नरसिंह राव यांच्या काळात महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही सोनिया गांधी म्हणाल्या.

त्याबरोबरच या विधेयकाला काँग्रेसचा पाठींबा आहे. मात्र याबरोबरच जातीय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली. तसेच हे विधेयक मंजूर झाले तर राजीव गांधी यांचे स्वप्न पूर्ण होईल, असंही सोनिया गांधी म्हणाल्या.

Updated : 20 Sep 2023 7:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top