Home > Max Political > महात्मा गांधी, गोडसे, नेहरू ह्यांच्यावर कितीवर्ष बोलणार; राज ठाकरे संतापले

महात्मा गांधी, गोडसे, नेहरू ह्यांच्यावर कितीवर्ष बोलणार; राज ठाकरे संतापले

पत्रकार परिषदेत पत्रकारांनी राज ठाकरे यांना स्वतंत्रवीर सावरकर यांच्यावर प्रश्न विचारला असता राज ठाकरे चांगले संतप्त झाले होते.

महात्मा गांधी, गोडसे, नेहरू ह्यांच्यावर कितीवर्ष बोलणार; राज ठाकरे संतापले
X

मनसे ( महाराष्ट्र नवनिर्माण सेना ) अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर होते. लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. दरम्यान राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

यावेळेस पत्रकारांनी राज ठाकरेंना प्रश्न विचारला असता राज ठाकरे चांगलेचं संतप्त झाल्याचं पहायला मिळालं. पत्रकारांनी राज ठाकरेंना प्रश्न विचारला; रणजीत सावरकर यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं महात्मा गांधींची हत्या ही नथुराम गोडसे यांच्या बंदुकीतून झाली नाही यावर उत्तर देताना राज ठाकरे चांगलेच तापले होते, यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, सोडा आता जुन्या गोष्टी, त्या गोष्टीतून काही प्रबोधन किंवा बोध घेणार नसू तर त्या गोष्टीचा काय उपयोग, काम करा त्यापेक्षा अशा परखड सब्दात राज ठाकरेंनी सूनावलं होतं

यानंतर राज ठाकरे यानी त्यांच्या (x) या सोशल मिडीया हँडल वर ऐक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या संदर्भात लिहीतांना राज ठाकरें यानी,

महात्मा गांधी गोडसे नेहरू यांच्यावर किती वर्ष बोलणार आहोत आपण जी माणसं गेली त्यांच्यावर वाद घालून हाती काय लागणार आज महागाईवर कोणी बोलत नाही शेतकऱ्यांवर कोणी बोलणार नाही शहरांमध्ये मराठी माणसांना डावल जात आहे त्यावर कोणी बोलत नाही फक्त एकमेकांवर चिखल फेक करत आहेत बस करा आता हे सगळं आणि मूळ प्रश्नाकडे या असे लिहीले आहे.




Updated : 2 Feb 2024 10:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top