Home > Max Political > Rahul Gandhi Speech : इन्होंने मणिपूर मे हिंदुस्थान को मारा है

Rahul Gandhi Speech : इन्होंने मणिपूर मे हिंदुस्थान को मारा है

Rahul Gandhi Speech : इन्होंने मणिपूर मे हिंदुस्थान को मारा है
X

सर्वोच्च न्यायालयानं क्लिनचीट दिल्यानंतर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजात काँग्रेस नेते राहुल गांधींनी आज सहभाग घेतला. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी लोकसभेत केंद्र सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. आज मी डोक्यानं नाही तर मनानं बोलू इच्छितो...आज मी एक-दोन मोठे मुद्दे बोलणार आहे...त्यापेक्षा जास्त नाही...तुम्ही रिलॅक्स राहू शकता, असा चिमटाही राहुल यांनी सत्ताधाऱ्यांना काढला.

भारत जोडो यात्रेत मला अनेक लोकांनी विचारलं की मी का चालतोय. कन्याकुमारी पासून ते कश्मीर पर्यंत मी का चालतोय. यात्रेच्या सुरूवातीला मी या प्रश्नांचं उत्तर देऊ शकत नव्हतो. मला वाटतं होतं की लोकांना समजून घेतलं पाहिजे, त्यासाठी मी चालतोय असं वाटत होतं. मात्र, काही वेळानंतर मला लक्षात आलं की, ज्या गोष्टीवर मी मनापासून प्रेम करतो, ज्या गोष्टीसाटी मी मरायलाही तयार होतो, शिव्या खाल्या, त्या गोष्टींना मला समजून घ्यायचं होतं, अशी आठवणही राहुल गांधींनी यावेळी सांगितली.

भारत जोडो संदर्भात इतकं मोठं अंतर चालण्याची प्रेरणा एका लहान मुलीपासून मिळाल्याचं राहुल गांधींनी यावेळी सांगितलं. यात्रेच्या आधीही मी दररोज ८ ते १० किलोमीटर चालत होतो. त्यामुळं यात्रेत दररोज २५ किलोमीटर चालायला काय अडचण आहे. मात्र, त्यानंतर काही दिवस चालल्यानंतर माझे पाय दुखायला लागले. त्यानंतर एका लहान मुलीपासून मला चालण्याची शक्ती मिळाली. या यात्रेत मला शेतकरी भेटले, त्यांच्या पिकांचं नुकसान झालं होतं. मी त्यांना विचारलं की, पीक विम्याचे पैसे मिळाले का ? त्यांचं उत्तर नाही असं होतं. भारत जोडो यात्रेत मी प्रत्येकाचं दु:ख समजून घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या मनात त्यावेळी अहंकार होता, भारतानं तो संपवून टाकल्याचं राहुल गांधींनी यावेळी सांगितलं.

मणिपूर हिंसाचाराच्या घटनेवरूनही राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. काही दिवसांपूर्वी मी मणिपूरला गेलो होतो. आपले पंतप्रधान अजूनही मणिपूरला गेलेले नाहीत. कारण पंतप्रधान मोदींसाठी मणिपूर हिंदुस्थान नाहीये. मी जेव्हा तिथल्या महिलांना विचारलं की काय झालंय ? त्यांनी सांगितलं की, तिच्या लहान मुलाला गोळ्या घालण्यात आल्या. मी पूर्ण रात्र त्याच्या मृतदेहाजवळ बसून होते. भीती वाटल्यानं घरच सोडून दिलं. काहीही सोबत आणलं नाही. दुसऱ्या एका कॅम्पमधील आणखी एका महिलेला विचारलं की, तुमच्यासोबत काय घडलं ? ती महिला थरथरायला लागली आणि बेशूद्ध झाली. या फक्त दोनच घटना आहेत ज्या मी ऐकल्या आहेत. मणिपूरमध्ये हिंदुस्थानला मारलं आहे. सरकारच्या राजकारणानं तिथल्या लोकांचा खून केल्याची संतप्त भावनाही राहुल गांधींनी सभागृहात व्यक्त केली. राहुल गांधी पुढे म्हणाले, “तुम्ही मणिपूरच्या लोकांना मारून हिंदुस्थानची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात. त्यामुळेच तुमचे पंतप्रधान मणिपूरमध्ये जाऊ शकत नाहीत. कारण त्यांनी मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली आहे. तुम्ही भारत मातेचे रक्षक नसून भारत मातेचे खूनी आहात”, अशा आक्रमक शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

Updated : 9 Aug 2023 8:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top