Home > Max Political > ''लोकसभा टीव्हीला फक्त स्पीकरचा चेहरा आवडतो'' असं राहुल गांधी का म्हणाले...

''लोकसभा टीव्हीला फक्त स्पीकरचा चेहरा आवडतो'' असं राहुल गांधी का म्हणाले...

लोकसभा टीव्हीला फक्त स्पीकरचा चेहरा आवडतो असं राहुल गांधी का म्हणाले...
X

राजस्थानमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आज तिसरा दिवस होता. कोटा येथे दिवसभर सुरू असलेल्या यात्रेचा दुसरा टप्पा लाडपुरा येथे सायंकाळी 6.30 वाजता संपला. आज भारत जोडो यात्रेने 23 किलोमीटर अंतर पार केले. यात्रेच्या शेवटी नुक्कड येथे पार पडलेल्या सभेत राहुल गांधी यांनी सभेला संबोधित केले.या सभेत राहुल गांधी यांनी मांडलेले काय महत्वाचे मुद्दे होते वाचा...

लोकसभा टीव्हीला फक्त स्पीकरचा चेहरा आवडतो

लोकसभा टीव्हीला फक्त स्पीकरचा चेहरा आवडतो, कॅमेरा विरोधकांकडे वळत नाही. कोटाच्या केवल नगरमध्ये झालेल्या स्ट्रीट कॉर्नर सभेत राहुल गांधींनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची खिल्ली उडवली. राहुल गांधी म्हणाले- आज भाजप आरएसएसने सर्वांना दडपून टाकले आहे. आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. आमचे माइक बंद केले जातात. लोकसभेत कॅमेरा विरोधकांकडे वळत नाही. लोकसभा अध्यक्ष राजस्थानचे आहेत, लोकसभा टीव्हीला त्यांचा चेहरा आवडतो, ते तोच दाखवतात.

मोदी सरकारने छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले

देशात बेरोजगारी आणि महागाई ही मोठी समस्या आहे. मोठे उद्योगपती रोजगार देत नाहीत. छोटे दुकानदार, उद्योगधंदे रोजगार देतात. त्यांच्या कणाच आता या सरकारने मोडला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. केंद्र सरकार केवळ दोन-चार उद्योगपतींना लाभ देत आहे. त्यांचे कोट्यवधींचे कर्ज काही मिनिटांत माफ केले जात असल्याचं घणाघात राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे..

राहुल यांनी गेहलोत सरकारच्या मोठ्या योजनांचे केलं कौतुक

राहुल गांधी यांनी गेहलोत सरकारच्या योजनांचे आज कौतुक केले. ते म्हणाले की, गेहलोत सरकारने २२ लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. 8 लाख लोकांचे वीज बिल माफ केले. चिरंजीवी योजनेंतर्गत उपचारासाठी 10 लाखांचा विमा दिला जात आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातही आम्ही हे काम केले.

ERCP हा राष्ट्रीय प्रकल्प बनवण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी पूर्ण केले नाही..

राजस्थानमध्ये पंतप्रधानांनी दोनदा आश्वासन दिले होते. ERCP राष्ट्रीय प्रकल्प करेल. राजस्थान सरकारला स्वत:च्या पैशातून एखादा प्रकल्प करायचा असेल तर तो थांबवा. या योजनेचा 13 जिल्ह्यांना फायदा होणार आहे, मात्र पंतप्रधानांनी माघार घेतली असल्याचं त्यांनी आज झालेल्या जाहीर सभेत म्हंटल आहे..

Updated : 7 Dec 2022 4:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top