Home > Max Political > राहुल गांधींच्या टी-शर्टचा ब्रँड कोणता?, भाजपच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर चर्चांचा धुरळा

राहुल गांधींच्या टी-शर्टचा ब्रँड कोणता?, भाजपच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर चर्चांचा धुरळा

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेसाठी राहुल गांधी शुक्रवारी तामिळनाडूत होते. त्या ठिकाणी त्याच्या कार्यक्रमापेक्षा त्याच्या टी-शर्ट जास्त चर्चा झाली.

राहुल गांधींच्या टी-शर्टचा ब्रँड कोणता?, भाजपच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर चर्चांचा धुरळा
X

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेसाठी राहुल गांधी शुक्रवारी तामिळनाडूत होते. त्या ठिकाणी त्याच्या कार्यक्रमापेक्षा त्याच्या टी-शर्ट जास्त चर्चा झाली. राहुल गांधी यांनी बर्बेरी कंपनीचा पांढरा टी-शर्ट परिधान केला आहे. भाजपने त्यांचा फोटो ट्विट करून लिहिले - पहा 41 हजार टी-शर्ट. भाजपने आपल्या ट्विटमध्ये कंपनीच्या ऑनलाइन विक्रीची किंमत देखील दर्शविली आहे.

भाजपच्या ट्विटला उत्तर देताना काँग्रेसने लिहिले- अरे… तुम्ही घाबरलात का? भारत जोडो यात्रेत जमलेली गर्दी पाहून. पहिला बेरोजगारी आणि महागाई या विषयावर बोला.... बाकी कपड्यांबद्दल चर्चा करायची झाली तर मोदीजींचा १० लाखांचा सूट आणि दीड लाखांचा चष्मा यावर चर्चा होईल. सांग मग काय करायचं...

राहुल गांधींचा हा टी-शर्ट वरून भाजपने ट्विट केल्यानंतर आता त्यावर अनेक प्रतिकिया येत आहे.. समाजमाध्यमांवर याबद्दल नक्की काय काय प्रतिक्रिया आल्या आहेत पाहुयात...

Spartan India या ट्विटर वापरकर्त्याने फकीर असं इंग्लिशमध्ये लिहीत खाली एका बातमीचा फोटो जोडला आहे त्यात १० लाखांचा सूट घातल्यानंतर पंतप्रधानांनी १. लाख रुपयांचा गॉगल घातल्याचं म्हंटले आहे...

Srinivas BV हे ट्विटर वापरकर्ते म्हणत आहेत की, खानदानी है, तुम्हारे वालों की तरह चड्डी पहनकर 'अडानी' की गोदी में थोड़ी बैठते है।जब देश आजाद हुआ था तो उनके परदादा जवाहरलाल ने 'भारत' निर्माण के लिए अपनी 98% यानी 196 करोड़ की संपत्ति दान कर दी थी, 40 हजार की T-shirt क्या है। तुम लोग कच्छा पहनकर ही घूमों!!

MOHD SUAIB हे ट्विटर वापरकर्ते भाजपच्या ट्विट ला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तो १० लाख रुपयांचा सूट घालेल फोटो शेअर करत म्हणत आहेत की, @BJP4India इसका मूल्य कितना है ? जिस प्रकार राहुल जी के वस्त्रों की कीमत दर्शायी गयी ठीक उसी प्रकार मोदी जी के वस्त्रों की कीमत भी दर्शायी जाए

क्योंकि राहुल गांधी जी भी लोकसभा के सांसद है औऱ मोदी जी भी लोकसभा के सांसद है जब राहुल जी के मूल्य बता सकते हो तो मोदी जी के क्यों नही ?

Amrrita Dhawan यांनी सुद्धा नरेंद्र मोदींच्या त्या १० लाखाच्या सूट वरून भाजपला टोला लगावला आहे त्यांनी म्हंटले आहे की, भाजपा वालों के पास अब ये ही काम बचा है 🤣🤣 मतलब #BharatJodoYatra सफल है 🙏 BTW @narendramodi के 10 लाख के सूट जितना महँगा तो नहीं 🤨🥸😀 अब एक काम करो अपनी दुकान बंद करके सो जाओ 😜😜

अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर भाजपने राहुल गांधींच्या या टी-शर्टची चर्चा सुरु केली आहे खरी पण यावरून राहुल गांधींपेक्षा लोक नरेंद्र मोदींच मोट्या प्रमाणावर ट्रोल करताना पाहायला मिळत आहे..

Updated : 9 Sep 2022 3:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top