Home > Max Political > राज्यात हिंदू देवस्थानांच्या संपत्तीवर दरोडे पडत आहेत : जयंत पाटील

राज्यात हिंदू देवस्थानांच्या संपत्तीवर दरोडे पडत आहेत : जयंत पाटील

राज्यात हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. आज विधानसभेत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी हे षडयंत्र काही वर्षापासून सुरू असल्याचा धक्कादायक दावा केला.

राज्यात हिंदू देवस्थानांच्या संपत्तीवर दरोडे पडत आहेत : जयंत पाटील
X

राज्यात हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. आज विधानसभेत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी हे षडयंत्र काही वर्षापासून सुरू असल्याचा धक्कादायक दावा केला.

सभागृहात जयंत पाटील यांनी देवस्थानांशी संबंधित जमिनींच्या घोटाळ्यांची कागदपत्रे मांडली. यामागे प्रभावी व्यक्ती कोण आहेत? यातून नक्की फायदा कोणाला झाला? विधानसभेत मंत्री महोदयांना खुलासा करावा, अशी विनंती जयंत पाटील यांनी सभागृहात केली. जयंत पाटील यांनी एका महिन्याच्या आत ‘दूध का दूध, पानी का पानी’ करण्यासाठी विशेष अधिकारी नेमावा आणि दोषी आढळणाऱ्यांना ताबडतोब शिक्षा व्हावी, अशी आग्रही मागणी केली.

गायरान जमिनींकडंही लक्ष वेधलं

जयंत पाटील यांनी शेतजमिनींच्या समस्येची सभागृहाला जाणीव करून दिली. शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनींचीही अशीच अवस्था आहे. गावकरी एकीकडे बेहिशोबी मालमत्ता विकत आहेत, तर दुसरीकडे गरीब आणि बेघर लोक या शेतांवर अतिक्रमण करत आहेत. या मालमत्ता मोकळ्या करण्याबरोबरच सरकारने बेघरांच्या प्रश्नाकडेही लक्ष द्यावे, असेही जयंत पाटील यांनी नमूद केले.

लवकरच भरती !

भरतीच्या कमतरतेमुळे अनेक तरुण पीडब्ल्यूडी परीक्षा देऊन घरी बसले आहेत. 2020 MPSC गटातील मुलांनी अद्याप काम सुरू केलेले नाही. त्यामुळे निवडणुकीपूर्वी केवळ घोषणा करण्यापेक्षा लवकर भरती करा, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या विम्याबाबत सरकारची भूमिका दिशाभूल करणारी आहे.

कापूस उत्पादक शेतकरी आणि कांदा उत्पादकांच्या असंख्य प्रश्न आहेत. सरकार शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना देत आहे. तरीही, विम्याचे हप्ते भरण्यास शेतकऱ्यानं कधीच नकार दिलेला नाही . प्रतिकूल परिस्थितीवर त्यांचा आक्षेप आहे. ही जाचक परिस्थिती बदलली पाहिजे. त्यामुळे विम्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. आता एक रुपयात विमा घेणार्‍या शेतकर्‍यांना विमा कंपन्या दरात पण उभं करणार नाहीत. सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

Updated : 20 March 2023 1:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top