Home > Max Political > पहिल्यांदाच भारत जोडो यात्रेत प्रियंका गांधी व रॉबर्ट वाड्रा...

पहिल्यांदाच भारत जोडो यात्रेत प्रियंका गांधी व रॉबर्ट वाड्रा...

आज भारत जोडो यात्रेत प्रियंका गांधी सहभागी झाल्या. आज यात्रेचा 78 वा दिवस आहे. भारत जोडो यात्रेत प्रियंका गांधी पहिल्यांदाच सहभागी झाल्या आहेत. त्यांच्यासोबत रॉबर्ट वाड्रा आणि त्यांचा मुलगा रेहान वाड्रा हे देखील आहेत.

पहिल्यांदाच भारत जोडो यात्रेत प्रियंका गांधी व रॉबर्ट वाड्रा...
X

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या मध्य प्रदेश मध्ये आहे, आज सकाळी खांडव्यातील बोरगाव बुजुर्ग येथू त्यांच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेशातील यात्रेचा हा दुसरा दिवस आहे. राहुल यांच्यासोबतच मध्य प्रदेश काँग्रेसचे सर्व नेते तर चालत आहेतच पण आज त्यांच्यासोबत त्यांची बहीण प्रियंका गांधीही यात्रेत सहभागी झाल्या. आज यात्रेचा 78 वा दिवस आहे. भारत जोडो यात्रेत प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) पहिल्यांदाच सहभागी झाल्या आहेत. त्यांच्यासोबत रॉबर्ट वाड्रा आणि त्यांचा मुलगा रेहान वाड्रा (Rehan Wadra) हे देखील आहेत. यापूर्वी सोनिया गांधी (sonia gandhi) या देखील एक दिवस भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभागी झाल्या होत्या. राहुल गांधी आणि प्रियंका यांच्यासोबत राजस्थान काँग्रेसचे नेते सचिन पायलटही (sachin pilot) आज यात्रेत सहभागी झाले आहेत.
राहुल गांधी आता रुस्तमपूरला पोहोचले आहेत. आज ते तंट्या भिल्ल यांच्या जन्मस्थळाला ते भेट देखील देणार आहेत. यानंतर दुल्हारच्या गुरुद्वारात जेवणाची सुट्टी होईल. येथून यात्रा छायगाव माखण येथे निघेल, तेथे नुक्कड सभेनंतर दुसऱ्या दिवशी यात्रा संपेल. रात्रीचा मुक्काम खरगोन जिल्ह्यातील खेर्डा येथे होईल. बुरहानपूरच्या बोदर्ली गावातून बुधवारी राज्यातील यात्रेला सुरुवात झाली. ही यात्रा १२ दिवसांत सहा जिल्हे पार करून ४ डिसेंबरला राजस्थानमध्ये दाखल होईल.

Updated : 2022-11-24T10:03:19+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top