Home > Max Political > पंतप्रधानांचा अवमान मान्य करता कामा नये, सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने मांडली भुमिका

पंतप्रधानांचा अवमान मान्य करता कामा नये, सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने मांडली भुमिका

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद जगभर उमटले आहेत. तर पंतप्रधान मोदी यांचे फोटो अरबी देशात कचराकुंडीवर लावण्यात आले आहेत. त्याचा शिवसेनेचे मुखपत्र सामनाने चांगलाच समाचार घेतला आहे.

पंतप्रधानांचा अवमान मान्य करता कामा नये, सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने मांडली भुमिका
X

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवरही उमटले. त्यामध्ये कतारसारख्या देशाने भारताने माफी मागावी, अशी मागणी केली. त्यावर शिवसेनेचे मुखपत्र सामनातून आपली भुमिका मांडली आहे.

सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, कतारसारख्या नखभर देशाने भारताने माफी मागावी, असे बजावले आहे. हे धक्कादायक आहे. भाजपच्या प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचे बाजूच्या इस्लामी देशांमध्ये उमटत आहेत. इस्लामी देशांच्या जागतिक संघटनेचे कतार, इराण, कुवैत, सौदी अरेबिया, बहरीन, संयुक्त अरब अमिरात, अफगाणिस्तान, मालदीव, जॉर्डन आणि पाकिस्तान या देशांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे देश प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भारताविरोधात आक्रमक झाले आहेत. कतारसारख्या देशांनी आपल्या पंतप्रधानांचे फोटो त्यांच्या कचराकुंडीवर लावले आहेत. त्यामुळे भारतीय पंतप्रधानांचा अपमान मान्य करता कामा नये, अशी भुमिका सामनाच्या अग्रलेखातून मांडली आहे.

भाजपच्या प्रवक्त्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेले वक्तव्य स्विकारार्ह नाही. मात्र या प्रकरणामुळे भारताच्या पंतप्रधानांचा अपमानही स्विकारार्ह नाही, असे मत सामनाच्या अग्रलेखात मांडले आहे. याबरोबरच भारतीय मालावर अरबी देशांनी बहिष्कार टाकला आहे. त्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अजूनही प्रत्युत्तर दिले नाही. तसेच गेल्या सात आठ वर्षात नेपाळ, भुटानसारख्या देशांनीही हिंदूस्थानला शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर आता कतारबरोबर मालदिवही हिंदूस्थानने माफी मागण्याची मागणी करत आहे. या देशांचे आकारमान जगाच्या नकाशावर एका टिंबाएवढेही नाही. मात्र हे देश भारतासारख्या अण्वस्रसज्ज देशाकडे पाहून गुरगुरत असल्याचे सामनात म्हटले आहे.

भारतावर ही वेळ कधी येईल असे वाटले नव्हते.

सामनाच्या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू सध्या कतार आणि कुवैत दौऱ्यावर आहेत. तर नुपुर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर या देशांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासोबतचे कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे भारतावर ही वेळ कधी येईल असे वाटले नव्हते, अशी खंत सामनातून मांडली आहे.

सामनातून भाजपवरही टीका

सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, भारतावर ही वेळ भाजपच्या कर्माने आली. धर्मांधतेचे धोरण आता त्यांच्यावर आणि देशावर उलटताना दिसत आहे. जेव्हा भाजपचे प्रवक्ते गरळ ओकत असतात तेव्हा भाजपचे वरिष्ठ नेते त्यांचे समर्थन करताना दिसतात. त्यामुळे नुपुर शर्मा या प्रकरणातही नेमके हेच घडले. मात्र या प्रकरणाचे सर्वप्रथम पडसाद हे कानपुर शहरात उमटले. तेथे तणाव निर्माण होऊन दंगल भडकली. त्यावेळीही भाजपने प्रवक्त्यांचा निषेध नोंदवला नाही. उलट हिंदू मुस्लिमांमध्ये दंगली भडकत असतील तर 2024 च्या अजेंड्यासाठी त्यांना चांगलेच वाटले. मात्र 57 इस्लामी देशांच्या संघटनेने भुमिका घेतल्यानंतर भाजपने निलंबनाची कारवाई केली.

भाजपचे राजकारण हे द्वेषाचे

भाजप द्वेषाचे राजकारण करत असून ज्यावेळी प्रकरण अंगलट त्यावेळी छे छे आम्ही निधर्मीच असल्याचे सांगत हात झटकले जातात. तर नुपुर शर्मा या प्रकरणातही भाजपने तेच केले. मात्र मुस्लिम देशांनी आणलेल्या दबावामुळे भाजपने नमतं घेत नुपुर शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. तर आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो, असे परराष्ट्र मंत्रालयाला ओरडून ओरडून सांगावे लागत आहे. पण स्थिती खरंच तशी आहे का?याबरोबरच कतारने भाजपला धडा शिकवला. पण भाजप शहाणपण घेईल का? असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.

Updated : 8 Jun 2022 5:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top