Home > Max Political > पंतप्रधान नरेंद्र मोदींची यवतमाळमध्ये सभा, सभेतील खुर्च्यांवर राहूल गांधींचे स्कॅनर कोडसह स्टीकर्स

पंतप्रधान नरेंद्र मोदींची यवतमाळमध्ये सभा, सभेतील खुर्च्यांवर राहूल गांधींचे स्कॅनर कोडसह स्टीकर्स

पंतप्रधान नरेंद्र मोदींची यवतमाळमध्ये सभा, सभेतील खुर्च्यांवर राहूल गांधींचे स्कॅनर कोडसह स्टीकर्स
X

Yavatmal News : यवतमाळच्या भारी या परिसरामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. मोदींच्या आत्तापर्यंत झालेल्या सभांमधील सर्वात मोठा सभा मंडप यवतमाळमध्ये उभारण्यात आला आहे. या सभेच्या ठिकाणी दोन लाखांहून अधिक महिला उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी नागपूरात राहूल गांधी यांच्या सभेला वापरलेल्या खुर्च्या आल्या आहेत. त्या खूर्च्यांवर राहूल गांधी यांचा फोटो आणि त्यावर स्कॅन टू डोनेट असा मजकूर असलेले स्टीकर्स दिसून आले आहेत.

राहूल गांधींच्या नागपूरातील सभेला याच खुर्च्या वापरल्या होत्या, त्या खुर्च्या यवतमाळमधील सभेतील कंत्राटदाराने आणल्या आहेत. या खुर्च्या घेऊन येताना त्यावरील स्टीकर्स काढले नाही. नरेंद्र मोदी यांची दुपारी 4 वाजता सभा होणार असून त्यापूर्वी हे स्टिकर्स काढले जाणार की नाही? हे आता काही वेळेत स्पष्ट होणार आहे.

या सभेचे आयोजन विदर्भातील 10 लोकसभा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आलेले आहे, तर मोदींच्या या सभेला राज्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्रीमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.

Updated : 28 Feb 2024 8:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top