Home > Max Political > #PrashantKishore: प.बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या पराभवाचा सर्व्हे किती खरा?

#PrashantKishore: प.बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या पराभवाचा सर्व्हे किती खरा?

#PrashantKishore: प.बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या पराभवाचा सर्व्हे किती खरा?
X

ममता बॅनर्जी यांचे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची कंपनी I-PACचा निवडणुक निकालाबाबतचा सर्व्हे सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यानुसार दुसऱ्या टप्प्यात नंदीग्राममध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळणार असून ममता बॅनर्जी यांचा पराभव होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पण व्हायरल झालेला सर्व्हे हा खोटा आहे, तसेच भाजपनेच हा खोटा सर्व्हे व्हायरल केल्याचे I PAC कंपनीने म्हटले आहे.


इंडियन पॉलिटिकल एक्शन कमिटी म्हणजे I PAC कंपनीने यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी भाजपतर्फे अशा खोट्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. I PACमध्ये कोणताही कर्मचारी डेस्कटॉप कॉम्प्युटर वापरत नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये एका डेस्कटॉप पीसीवर सर्व्हे दाखवण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला पराभव दिसत असल्याने भाजप आता कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी असे प्रकार करत असल्याची टीकाही करण्यात आली आहे.

पश्चिम बंगालमध्ये 1 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर अखेरच्या दिवशी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चांगल्या झडू लागल्या आहेत.

Updated : 31 March 2021 10:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top