Home > Max Political > OBC नेत्यांना प्रकाश आंबेडकरांचा इशारा, तर भुजबळांनी केली विनंती

OBC नेत्यांना प्रकाश आंबेडकरांचा इशारा, तर भुजबळांनी केली विनंती

OBC नेत्यांना प्रकाश आंबेडकरांचा इशारा, तर भुजबळांनी केली विनंती
X

सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षण, ओबीसी, धनगर आरक्षणावरून वातावरण चांगलचं तापलंय. अशा परिस्थितीत ओबीसी विरूद्ध मराठा आरक्षण असा थेट संघर्ष सुरू झालाय. या वादातच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांचीही एंट्री झालीय.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं २५ नोव्हेंबर रोजी मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं संविधान सन्मान सभा पार पडली. यावेळी वंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीकाही केली. ओबीसी नेते तथा महायुतीमधील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसींचे नेते प्रकाश शेंडगे या दोघांनाही प्रकाश आंबेडकर यांनी “माझ्या नादी लागू नका” असा थेट इशाराच दिलाय. ओबीसी नेत्यांनी माझ्या नादी लागू नये, कारण त्यांचा इतिहास काढला तर मंडल आयोग लागू करतांना तुम्ही मंडलबरोबर नव्हते तर कमंडलबरोबर होतात, असा गंभीर आरोपच प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी त्यावेळी जनता दल आणि जनता पक्षाबरोबर मिळून आम्ही ओबीसींसाठी आरक्षण मिळवल्याचा दावाच प्रकाश आंबेडकरांनी केलाय. याच ओबीसी नेत्यांना आता आरक्षण वाचवता येत नाही, म्हणून भिडवण्याची भाषा करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, प्रकाश आंबेडकरांच्या इशाऱ्यावर छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले,” मी प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात एकही शब्द काढलेला नाही. मंडल आयोगासाठी प्रकाश आंबेडकरांनी फार मेहनत आणि कष्ट घेतले आहेत. आता आम्ही अडचणीत असतांना प्रकाश आंबेडकरांनी सहकार्य करावं, अशी विनंतीच भुजबळ यांनी केलीय. विनंती करण्यात काहीही चूकीचं नाही. मात्र, ओबीसी आणि मराठ्यांचं ताट वेगळं असायला पाहिजे, असं मत प्रकाश आंबेडकरांनी मांडल्याची आठवणही भुजबळांनी यावेळी करून दिली.

Updated : 26 Nov 2023 11:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top