Home > Max Political > रायगडचे खासदार आणि आमदार यांच्या पुत्रावर गुंडगिरीचा आरोप

रायगडचे खासदार आणि आमदार यांच्या पुत्रावर गुंडगिरीचा आरोप

रायगडचे खासदार आणि आमदार यांच्या पुत्रावर गुंडगिरीचा आरोप
X

रायगड: जिल्ह्यातील पोस्को कंपनीच्या भंगाराच्या कंत्राटाचा वाद आता चांगलाच चिघळला आहे. या वादात आता स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. तासगाव, भागाड, येलावडे, विळे गावांतील ग्रामस्थांनी पोस्को कारखान्याच्या प्रवेशद्वारावर शनिवारी आंदोलन केले. कंपनीच्या वादात बाहेरच्या माणसांचा होणारा हस्तक्षेप आणि दादागीरी सहन करणार नाही, असा इशारा गावकऱ्यांनी दिला.

रायगडचे खासदार सुनिल तटकरे, महाडचे आमदार भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या विरोधात गुंडगीरीचे आरोपही यावेळी ग्रामस्थांनी केला. या वादात स्थानिक व्यावसायिकांच्या वाहनांचे नुकसान केले जात असुन स्थानिकांवर गुन्हे देखील दाखल केले जात आहेत, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. प्रशासनाने यामध्ये लक्ष घालावे अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.

Updated : 26 Jun 2021 11:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top