Home > Max Political > खोके दिन, गद्दार दिन साजरा न करण्यासाठी पोलिसांच्या नोटिसा

खोके दिन, गद्दार दिन साजरा न करण्यासाठी पोलिसांच्या नोटिसा

खोके दिन, गद्दार दिन साजरा न करण्यासाठी पोलिसांच्या नोटिसा
X

महाराष्ट्रातील सत्तांतराला आता जवळपास एक वर्षांच्या कालावधी पूर्ण होतोय. मात्र, त्याआधीच महाविकास आघाडी विरोधात महायुतीत संघर्ष पेटलाय. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नेत्यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून गद्दार म्हणून संबोधण्यात येत आहे, तर ५० खोके एकदम ओके अशा घोषणाही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात येतात. त्यातच उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा वर्धापन दिन स्वतंत्ररित्या साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमातच उद्धव ठाकरे यांनी खोके दिन साजरा करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभरात गद्दार दिन साजरा करण्यात येणार आहे. या आवाहनानंतर पोलिसांनी खोके दिन आणि गद्दार दिन साजरा न करण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासह समर्थकांना गद्दार, ५० खोके एकदम ओके, ईडी सरकार म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संबोधायला सुरूवात केली. उद्धव ठाकरेंनी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्याविरोधात महाराष्ट्रात खोके दिन साजरा करण्याचं आवाहन उपस्थितांना केलं. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून गद्दार दिन साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलंय. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना खोके दिन व गद्दार दिन साजरा न करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. नोटिसा बजावूनही जर पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून हा दिवस साजरा करण्यात आला तर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारी पोलिस प्रशासन आहे. महाविकास आघाडी सत्तेत असताना राष्ट्रवादी हा पक्षही महत्वाचा होता. त्यामुळे राष्ट्रवादीने हा दिवस गद्दार दिवस म्हणून साजरा करणार असल्याचे सांगितले आहे. एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते त्यांच्यासह समर्थक आमदारांनी गद्दारी केली असा आरोप शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादीने केला आहे.

यासंदर्भात पुण्यात आंदोलन केल जातयं. गद्दार दिवस म्हणून राष्ट्रवादीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. खोके ठेवत राष्ट्रवादीकडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा निषेध करण्यात येत आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात हे आंदोलन होत आहे. तर यावर शिवसेना शिंदे गटाने प्रत्युत्तरही दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना खोके दिन तर राष्ट्रवादी काँग्रेस गद्दार दिन साजरा करत आहे. अशातच याला शिवसेना प्रत्युत्तर देणार आहे. याच दिवसाला शिवसेना शिंदे गटाकडून स्वाभिमान दिन म्हणून आजचा हा दिवस साजरा करणार असून महाविकास आघाडीला प्रत्युत्तर देणार आहेत. तर या दरम्यान खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी 20 जूनला ‘जागतिक गद्दार दिन’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. हे पत्र संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की लोक आग्रहास्तव ! असं कॅप्शन देत संजय राऊत यांनी पत्र पोस्ट केलं आहे.

Updated : 20 Jun 2023 9:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top