Home > Max Political > कोव्हिड काळात ऑक्सिजन अभावी देशात एकाही रुग्णांचा मृत्यू नाही, मोदी सरकारची संसदेत माहिती...

कोव्हिड काळात ऑक्सिजन अभावी देशात एकाही रुग्णांचा मृत्यू नाही, मोदी सरकारची संसदेत माहिती...

कोव्हिड काळात ऑक्सिजन अभावी देशात एकाही रुग्णांचा मृत्यू नाही, मोदी सरकारची संसदेत माहिती...
X

कोरोनाच्या लाटेत अनेक लोकांचा ऑक्सिजन न मिळाल्यानं मृत्यू झाला. अनेक लोकांना ऑक्सिजन बेड मिळाला नाही. अनेक राज्यांतील हॉस्पिटलने ऑक्सिजन संपण्यापुर्वी प्रेस नोट काढून ऑक्सिजन संपल्याचं सांगितलं. ऑक्सिजन न मिळाल्यानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केले.

मात्र, देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचं मोदी सरकारने संसदेत विचारलेल्या एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात म्हटलं आहे.

कॉंग्रेस नेते के सी वेणू गोपाल यांनी आरोग्य खात्याला प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना

देशातल्या राज्य सरकारांच्या रेकॉर्ड मध्ये ऑक्सिजन अभावी लोकांचा मृत्यू झाला आहे. असं नोंदवले नसल्याचं आरोग्य विभागाने उत्तरात म्हटलं आहे.


सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या पावसाळी अधिवेशनात खासदार के सी वेणूगोपाल यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्य खात्याने ही माहिती दिली आहे. एकंदरींत ऑक्सिजन अभावी ज्या लोकांचा मृत्यू झाला. त्या लोकांचा मृत्यू ऑक्सिजन अभावी झाला नसल्याचं जर सरकार सांगत असेल तर त्या लोकांचे मृत्यू कशाने झाले? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.

Updated : 20 July 2021 4:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top