Home > Max Political > ठाकरे सरकारने पिक विम्याचे पैसेच भरले नाहीत – देवेंद्र फडणवीस

ठाकरे सरकारने पिक विम्याचे पैसेच भरले नाहीत – देवेंद्र फडणवीस

ठाकरे सरकारने पिक विम्याचे पैसेच भरले नाहीत – देवेंद्र फडणवीस
X

नांदेड मध्ये बिलोली देगलूर पोट निवडणूकीचे बिगुल वाजले आहेत. येथील भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारार्थ आज सोमवारी ता. बिलोली येथे जाहीर सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा टीक केली. "हे सरकार लबाड आहे. या सरकार ला शेतकरी लोकांचे अश्रू दिसत नाहीत. पीक विमा या सरकारने का भरला नाही? 1700 कोटी रूपयांचा थकलेला पिक विमा राज्य सरकार का भरत नाही? या प्रश्नांची उत्तरे राज्य सरकारने द्यावी", असा सवाल विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला.

"वयात आलेल पोरगं गेलं तर जेवढं दुःख होतं तसंच दुःख हाताला आलेलं पीक गेल्याने होते." असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांची बाजू उचलून धरली.

Updated : 25 Oct 2021 9:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top