Home > Max Political > पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात बँकिंग व्यवस्थेत केवळ अराजकता - जयराम रमेश

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात बँकिंग व्यवस्थेत केवळ अराजकता - जयराम रमेश

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात बँकिंग व्यवस्थेत केवळ अराजकता - जयराम रमेश
X

पेटीएम पेमेंट बँक संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या निर्णयाविषयी भारतीय अर्थतज्ज्ञ आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी आपल्या एक्स हँडल(X Handle) वरुन ट्विट यावर भाष्य केलं आहे.

ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील गेल्या 10 वर्षांत बँकिंग व्यवस्थेत केवळ अराजकता आणली आहे. प्रथम, कोणत्याही नियोजनाशिवाय आणि आरबीआयच्या आक्षेपांशिवाय घेतलेला विनाशकारी नोटाबंदीचा निर्णय. त्यानंतर, 2018 मध्ये IL&FS ची दिवाळखोरी NBFC क्षेत्राला बसली. 2018 मध्ये येस बँक आणि डीएचएफएलमध्येही हजारो कोटींचे घोटाळे झाले. लक्ष्मी विलास बँक आणि पीएमसी बँकही अपयशी ठरल्या. नीरव मोदी प्रकारातील लोकांना जनतेच्या पैशातून फरार होण्यासाठी मोफत व्हिसा मिळाला. सामान्य भारतीयांना त्यांची बचत काढता येत नाही.




दरम्यान आता आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेतील सर्व सेवा बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. या आदेशाचा नेहमीप्रमाणे सामान्य भारतीयांना सर्वाधिक फटका बसणार आहे, असंही जयराम रमेश म्हणाले.चिनी लिंक्स असलेली फर्म - एका क्षणी 31% चिनी मालकी आणि ₹7000 कोटी पेक्षा जास्त चीनी गुंतवणूक - ज्याला यापूर्वी 2022 मध्ये RBI द्वारे गैर-अनुपालनासाठी दंड ठोठावला गेला आहे, कठोर देखरेखीखाली का ठेवले गेले नाही? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.


Updated : 1 Feb 2024 2:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top