Home > Max Political > रामनवमीनिमित्त हेमंत गोडसे यांनी नाशिकातून रामचरणी घातले साकडे...!

रामनवमीनिमित्त हेमंत गोडसे यांनी नाशिकातून रामचरणी घातले साकडे...!

रामनवमीनिमित्त हेमंत गोडसे यांनी नाशिकातून रामचरणी घातले साकडे...!
X

राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आला असून लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यतील मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत. अशी परिस्थिती असताना देखील राज्यात अजूनही काही ठिकाणी महायुतीचे उमेदवार किंवा जागावाटप झालेले दिसत नाही. नाशिकसह अन्य जागांवर महायुतीचे उमेदवार अजूनही घोषित केलेले नाहीत. यातच शिवसेना शिंदे गटाटे खासदार यांनी गोडसे यांनी रामनवमीनिमित्त आज नाशिकच्या काळाराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी श्रीरामाला साकडे घालत, उमेदवारीची संधी मिळू दे, यश प्राप्त होऊ दे, असं हेमंत गोडसे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपाने देशाला सक्षम नेतृत्व लाभलं आहे. त्यामुळे महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत. मोदींच्या नेतृत्वात देशाची मोठी प्रगती होत आहे. पुन्हा एकदा त्यांचे हात बळकट करण्याची संधी मिळू दे. आपल्याला संधी मिळू दे, सोबतच यशस्वी विजय मिळू दे, असं श्रीरामाचे दर्शन घेताना हेमंत गोडसे यांनी साकडं घातल्याचं सांगितलं.

नाशिक जागावाटपाबाबत काय हेमंत गोडसे?

नाशिकच्या जागावाटपाबाबत हेमंत गोडसे म्हणाले की, नाशिकची जागा ही शिवसेनेची(शिंदे सेना) असून नाशिकचे जागावाटप एक ते दोन दिवसात निश्चित होईल. यावेळी, बोलताना गेल्या दहा वर्षांत अनेक कामे केली असल्याचेही ते म्हणाले. संघटनात्मक बांधणी उत्कृष्ट पध्दतीने झाली आहे. त्यामुले याठिकाणी प्रभू रामचंद्राचे धनुष्यबाण निवडून येईल, असा विश्वास हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला.

Updated : 17 April 2024 9:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top