Home > Max Political > व्यासपीठावरून बोलताना शरद पवारांच्या दिशेने फेकली वस्तु...! नक्की काय घडलं? वाचा

व्यासपीठावरून बोलताना शरद पवारांच्या दिशेने फेकली वस्तु...! नक्की काय घडलं? वाचा

व्यासपीठावरून बोलताना शरद पवारांच्या दिशेने फेकली वस्तु...! नक्की काय घडलं? वाचा
X

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा नारळ बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या हस्ते फोडण्यात आला. यावेळी सभेच्या व्यासपीठावरून बोलत असताना पब्लिकमधून शरद पवारांच्या दिशेने एक वस्तू फेकण्यात आली. परंतु अत्यंत चपळाईने ती वस्तू शरद पवारांना न लागता पाठीमागे उभा असलेल्या बॉडीगार्डने वरच्या वर हातात धरली. आणि शरद पवारांचा त्यापासून बचाव केला. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर असलेला संताप आणि हावभाव बघून लोकांच्या मनात शंका निर्माण झाली की नेमकी ती वस्तू काय असेल? हा प्रसंग राज्यात सर्व वृत्तवाहिन्यांवर लाईव्ह चालू असल्याकारणाने याविषयी महाराष्ट्रातील राजकारणात चांगलीच चर्चा रंगली होती.

दरम्यान, शरद पवार सभेच्या व्यासपीठावरून बोलत असताना त्यांच्या दिशेने फेकण्यात आलेली वस्तू ही दुसरी-तिसरी काही नसुन तो एक लेपल माईक होता. त्यामुळे या विषयाची चर्चा रंगली होती. खरंतर कोणताच अनुचित प्रकार नसुन शरद पवारांचा आवाज कॅमेऱ्यात व्यवस्थित रेकॉर्ड व्हावा यासाठी त्यांच्या तो लेपल माईक देण्यासाठी त्यांच्या दिशेने भिरकावण्यात आला होता. मात्र ही पध्दत अत्यंत चुकीची असल्यामुळे राज्यात याविषयी चर्चा चांगलीच चर्चा रंगली.

शरद पवारांनी गावच्या आठवणींना दिला उजाळा

शरद पवार यांचं मुळ गाव हे कान्हेरी मानलं जातं. गावातील मारुतीच्या मंदिरात निवडणूकीच्या प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर शरद पवार असो किंवा सुप्रिया सुळे प्रत्येक निवडणूकीच्या प्रचाराला इथूनच सुरुवात करतात. त्यामुळे शरद पवार यांच्या सभेचे आयोजन या कान्हेरी गावातच करण्यात आले होते. निवडणूकीचा नारळ फोडल्यानंतर पवारांनी सभास्थळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानिमित्ताने कान्हेरी गावाशी संबंधित असलेल्या अनेक आठवणी शरद पवारांनी सांगितल्या. सुप्रिया सुळे यांचा जन्म आणि लग्नदेखील याच गावात झाले असल्याची माहिती शरद पवारांनी दिली. सभेला उपस्थित असलेल्या नागरिकांची नावे घेत शरद पवारांनी या अनुषंगाने शरद पवारांनी या गावच्या आठवणींना उजाळा दिला.

Updated : 19 April 2024 12:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top