Home > Max Political > Obc Reservation: हा घ्या देवेंद्र फडणवीसांच्या खोटारडेपणाचा लेखी पुरावा: हरी नरके

Obc Reservation: हा घ्या देवेंद्र फडणवीसांच्या खोटारडेपणाचा लेखी पुरावा: हरी नरके

Obc Reservation: हा घ्या देवेंद्र फडणवीसांच्या खोटारडेपणाचा लेखी पुरावा: हरी नरके
X

ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर भाजपने राज्यातील महाविकास सरकारच्या विरोधात मोठं आंदोलन केलं. ओबीसी आरक्षण जाण्यासाठी ठाकरे सरकार जबाबदार आहे. असा घणाघात भाजपच्या सर्वच नेत्यांनी केला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.

मात्र, ठाकरे सरकारवर ओबीसी आरक्षणाचं खापर फोडणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:चं सरकार असताना केंद्राकडे ओबीसी आरक्षणासाठी डाटा मागितला होता. या संदर्भात प्राध्यापक हरी नरेक यांनी एक ट्वीट केलं असून या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारकडे ओबीसी आरक्षणासाठी 2011 च्या जनगणनेची माहिती मागत आहेत.

काय म्हटलंय ट्वीट मध्ये

हा घ्या देवेंद्र फडणवीसांच्या खोटारडेपणाचा लेखी पुरावा-स्वत: फडणवीस १ऑगस्ट २०१९ ला ओबीसी आरक्षणासाठी SECC 2011 जनगणना डाटा केंद्र सरकारला मागतात. मोदी सरकारचे २० नोव्हें २०१९ ला उत्तर येते. या डेटावर अभ्यास चालू आहे. तरीही ही गॅंग ओबीसीचा बुद्धीभेद करणारी खोटी वक्तव्ये दररोज करीत आहे.Updated : 2022-09-06T12:38:27+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top