Home > Max Political > अरब देशातील कंचराकुंड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो, जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला निषेध

अरब देशातील कंचराकुंड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो, जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला निषेध

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर जगभरातून संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत. त्यापार्श्वभुमीवर अरबी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो कचराकुंडीवर लावण्यात आल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली.

अरब देशातील कंचराकुंड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो, जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला निषेध
X

नुपुर शर्मा यांच्या मोहम्मद पैगंबर यांच्याविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अरब देशांनी भारताने माफी मागावी, अशी मागणी केली आहे. त्यापार्श्वभुमीवर अरब देशांकडून भारतावर दबाव वाढत असल्याने भाजपने नुपुर शर्मा यांना ६ वर्षांसाठी निलंबित केले. दरम्यान अरबी देशांमध्ये पंतप्रधान मोदी यांचे फोटो कचराकुंडीवर लावले असल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला.

जितेंद्र आव्हाड ट्वीट करून म्हणाले की, अरब देशातील कचराकुंड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावले आहेत. आम्ही मोदी आणि भाजपला या देशात लोकशाही मार्गाने पराभूत करूच पण आमचा मोदी विरोध या देशात आहे. मात्र, कचराकुंडीवर आमच्या भारताच्या पंतप्रधानाचा फोटो लावणं, हे आम्हाला मान्य नाही या कृतीचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रीया जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

भाजपाच्या प्रवक्त्याने पैगंबरांबद्दल जे काही लिहीले होते, ते अगदीच चुकीचे होते. कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावणे हे चुकीचेच आहे. जे कोणी असे विद्वेषाचे प्रयोग करीत असतात त्यांना कडक शासन झालेच पाहीजे. तरच समाजात सलोखा राखला जाईल, असे मत आव्हाड यांनी व्यक्त केले.

जातीय धार्मिक विद्वेष पसरवून आपण देशाचे नुकसान करीत आहोत. याची जाणीव प्रत्येकानेच ठेवली पाहीजे. आज अरब लोकांनी पाऊल उचलले आहे. कारण आपल्या देशातील मुस्लिम द्वेष वाढतोय. उद्या ख्रिश्चन द्वेष वाढला म्हणून अमेरीकेने हे पाऊल उचलले तर काय होईल. देशाचे हित कशात आहे हे ध्यानात घ्यावे, असा सल्ला जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

Updated : 7 Jun 2022 5:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top