Home > Max Political > आता आम्ही हटणार नाही; ओबीसीतूनच आरक्षण घेणार - मनोज जरांगे पाटील

आता आम्ही हटणार नाही; ओबीसीतूनच आरक्षण घेणार - मनोज जरांगे पाटील

आता आम्ही हटणार नाही; ओबीसीतूनच आरक्षण घेणार - मनोज जरांगे पाटील
X


पुणे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आपला मोर्चा घेऊन पुण्याच्या रांजणगांव जवळ पोहचले आहेत. गावागावातून लोक त्यांच्या मोर्चात सहभागी होत आहेत. हा लाखोंचा जनसमुदाय घेऊन ते मुंबईकडे रवाना झालेले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की,द्यायचा तेव्हढा भरपूर वेळ दिला सरकारला पण; आता आम्ही मागे हटणार नाही, ओबीसीतूनच आरक्षण घेणार.

या मोर्चामध्ये लहान मुलांपासून ते वयोवृध्दांपर्यंत सर्वच नागरीक मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे मुस्लीम बांधव सुध्दा या मोर्चात जरांगेसोबत मोठ्या संख्येने सहभागी झालेले पहायला मिळत आहेत.

मुंबईत दाखल झाल्यानंतर 26 जानेवारी पासून आमरण उपोषणास सुरुवात होईल अस जरांगे पाटील म्हणाले.

गिरीश महाजनांनी दिला जरांगेंना सल्ला

भाजप नेते गिरीश महाजनांनी (Girish Mahajan) मनोज जरांगेंना मुंबईत येऊ नका असा सल्ला दिला. कारण एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईत आलात तर इथलं जनजिवन विस्कळीत होऊ शकतं. रस्ते व वाहतूक यंञणा यावर त्याचा विपरीत परीणाम होऊ शकतो. ही गोष्ट गांभीर्य जरांगे पाटीलांनी लक्षात घ्यावं असा सल्ला गिरीश महाजनांनी जरांगेंना दिला.

गिरीश महाजनांना जरांगे पाटलांचं प्रत्यत्तुर

आम्ही अतिशय शांततेच्या मार्गाने हा आंदोलनाचा मोर्चा घेऊन मुंबईकडे निघालेला आहोत. आमच्या येण्याने कुणालाही ञास होणार नाही उलट तुमच्या लेकरांचा, गावखेड्यातल्या लेकरांचा सर्वच मराठा लेकरांचा फायदा होणार आहे यात कुणाचंही नुकसान किंवा कुणालाही ञास होणार नाही.

Updated : 23 Jan 2024 7:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top