Home > Max Political > बराक ओबामांच्या पुस्तकात मोदींबदद्ल चकार शब्द नाही – शशी थरुर

बराक ओबामांच्या पुस्तकात मोदींबदद्ल चकार शब्द नाही – शशी थरुर

बराक ओबामांच्या पुस्तकात राहुल गांधी यांच्याबद्दल जे लिहिले गेले आहे, त्याची चर्चा सध्या सुरू आहे. पण या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल ओबामांनी काही लिहिले का, याबद्दल काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी माहिती दिली आहे.

बराक ओबामांच्या पुस्तकात मोदींबदद्ल चकार शब्द नाही – शशी थरुर
X

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी 'A Promised Land' या आपल्या पुस्तकात राहुल गांधी हे नैराश्यग्रस्त आणि अकार्यक्षम असल्याची टीका केली आहे. या मुद्द्यावरुन काँग्रेसने नाराजी व्यक्त केली असताना काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी मात्र या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बराक ओबामा यांनी चकार शब्दही लिहिलेला नाही उलट माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे भरभरुन कौतुक केले आहे, असे म्हटले आहे.

"बराक ओबामा यांच्या पुस्तकाची प्रत मला मिळाली आहे. मी प्रत्येक पान वाचलेले नसले तरी अनुक्रमणिकेत भारताबद्दल जेवढा उल्लेख आहे ते सारं काही वाचले आहे. त्यात खूप काही नाहीये. मोठी बातमी म्हणजे या ९०२ पानांमध्ये नरेंद्र मोदी यांचा उल्लेख कुठेच नाहीय." असे थरुर यांनी म्हटले आहे.

डॉ. मनमोहन सिंग यांची खूप स्तुती करण्यात आली आहे. " विद्वान, विचारी आणि प्रचंड प्रामाणिक, असामान्य प्रतिभा आणि शालीन अशा या माणसासोबत खूप बरे वाटले. चांगले आणि निर्मितीक्षम संबंध प्रस्थापित झाले". या शब्दात ओबामा यांनी कौतुक केले आहे. डॉ. मनमोहन सिंग हे आपल्या परराष्ट्र धोरणाबद्दल अत्यंत सावध असले तरी त्यांच्याबद्दलचा आदर सगळ्यांनाच आहे."

"भारतात मला सगळ्यात जास्त आकर्षण आहे ते महात्मा गांधींबद्दल. लिंकन, किंग, मंडेला आणि गांधीजी यांचा माझ्या विचारसरणीवर प्रचंड प्रभाव आहे" असे ओबामा यांनी म्हटले आहे. पण त्यांनी हिंसाचार, स्वार्थीपणा, भ्रष्टाचार, राष्ट्रवाद, जातीवाद आणि धार्मिक असहिष्णुता याच्याबद्दल तीव्र काळजी व्यक्त केली असल्याचे थरुर यांनी म्हटले आहे.

संघाच्या लोकांनी यातील फक्त काही ओळी उचलून सोशल मीडियावर जो आनंद व्यक्त केला आहे, त्यांना या अतिरिक्त माहितीमुळे आणखी बरे वाटेल असा टोलाही थरुर यांनी लगावला आहे. आता दुसऱ्या आवृत्तीमधून डॉ. मनमोहन सिंग यांची सत्ता गेल्यानंतरच्या काळातबाबत बराक ओबामा यांनी काय लिहिले असेल त्याचा अंदाज यावरुन येतो, असेही थरुर यांनी म्हटले आहे.

Updated : 16 Nov 2020 4:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top