Home > Max Political > राज्य सरकारने कितीही दडपशाही केली तरी, आम्हाला OBC मध्येच आरक्षण हवे - मनोज जरांगे

राज्य सरकारने कितीही दडपशाही केली तरी, आम्हाला OBC मध्येच आरक्षण हवे - मनोज जरांगे

राज्य सरकारने कितीही दडपशाही केली तरी, आम्हाला OBC मध्येच आरक्षण हवे - मनोज जरांगे
X

Maratha Reservation Update : राज्यात सध्या मनोज जरांगे पाटील यांचं अमरण उपोषण सुटलं असून आता साखळी उपोषण चालू आहे. अशातच आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मराठा समाजाचाविषयी द्वेष आहे, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. त्यांना दिसेल मराठा समाज काय असतो ते, जसा कापूस फुटल्यानंतर संपूर्ण शेत पांढरं दिसते तसे सर्वत्र मराठेच-मराठे दिसतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

जरांगे पाटील पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात अशांतता पसरवू नका, माझ्यावर दबाव आणू नका, मी कुणावरही राजकीय टीका केलेली नाही. दहा टक्यांचे आरक्षण स्विकारले तर मी चांगला नाही स्विकारले तर याला गुंतवा, अशी यांची भूमिका आहे. त्यामूळे संयम सूटला मी नेत्याला बोललो तर मराठा समाजाच्या नेत्याला राग येण्याचे कारण काय? असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

राज्य सरकारकडून दडपशाही सूरू असल्याची टीका त्यांनी यावेळी केली, राज्य सरकारने कितीही दडपशाही केली तरी, आम्हाला OBC मध्येच आरक्षण हवे आहे, तर मराठा आंदोलकांनी शांततापू्र्वक आंदोलन करावे असे आवाहन जरांगेनी महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना केले आहे. मी मराठा समाजाची हार होऊ देणार नाही, मला जेलमध्ये टाकलं तरी पुन्हा येऊन लढेल फडणवीस साहेब माझ्या नादी लागू नका, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

सरकारच्या शिष्टमंडळाकडून फसवणूक

सरकारने शिष्टमंडळ पाठवून आमची फसवणूक केली आहे. आरक्षण आज देऊ, उद्या देऊ अशी आश्वासने आम्हाला देण्यात आली होती, असं जरांगे म्हणाले. यामध्ये राज्याचे मंत्री, अधिकारी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आहेत. या सगळ्यांवर आम्ही महाराष्ट्रभर गुन्हे दाखल करू, आम्हला जे कायदेशीर कचाट्यात आणतील, तर आम्हीही त्यांना कायदेशीर अडचणीत आणू, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली आहे.

Updated : 28 Feb 2024 7:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top