Home > Max Political > धनंजय मुंडेंबाबत लवकरात लवकर निर्णय – शरद पवार

धनंजय मुंडेंबाबत लवकरात लवकर निर्णय – शरद पवार

धनंजय मुंडेंबाबत लवकरात लवकर निर्णय – शरद पवार
X

राज्याचे समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर त्यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार अशी चर्चा असताना यावर आता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत आपली भेट घेऊन आपल्याला सर्व परिस्थितीची माहिती दिली.

आता यासंदर्भात पक्षातील इतर सहकाऱ्यांशी तातडीने चर्चा करुन त्यांची मते जाणून घेणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांना भेटून मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवल्याची चर्चा आहे.

Updated : 14 Jan 2021 1:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top