Home > Max Political > "आता फेरविचाराची गरज"अमोल कोल्हे यांच्या फेसबुक पोस्टने चर्चांना उधाण

"आता फेरविचाराची गरज"अमोल कोल्हे यांच्या फेसबुक पोस्टने चर्चांना उधाण

आता फेरविचाराची गरजअमोल कोल्हे यांच्या फेसबुक पोस्टने चर्चांना उधाण
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे सध्या एका फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे,

" सिंहावलोकनाची वेळ:- गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलं उचलली. पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय..थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन!

घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचार सुद्धा!

त्यासाठीच एकांतवासात जातोय.. काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू...नव्या जोमाने, नव्या जोशाने!!

टीप:- फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही"

असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी कोणते टोकाचे निर्णय घेतले, कोणती अनपेक्षित पावलं उचलली, ते कोणत्या निर्णयांचा फेरविचार करणार आहेत, याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे. एकांत वासातून परतल्यानंतर अमोल कोल्हे कोणता निर्णय जाहीर करणार याबाबत आता बरीच चर्चा सुरू झाली आहे. अमोल कोल्हे गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यात सक्रीय झालेले दिसले आहेत.


नुकतेच ते पिंपरी चिंचवडमध्येही शरद पवार यांच्यासोबत होते. पण अचानक अमोल कोल्हे यांनी आपल्या काही निर्णयांची फेरविचार करण्याची भाषा केल्याने याचे कारण काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Updated : 7 Nov 2021 4:10 PM GMT
Next Story
Share it
Top