Home > Max Political > "देवेंद्र फडणवीस यांना हे शोभत नाही" एकनाथ खडसे संतापले

"देवेंद्र फडणवीस यांना हे शोभत नाही" एकनाथ खडसे संतापले

देवेंद्र फडणवीस  यांना हे शोभत नाही एकनाथ खडसे संतापले
X

देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांच्यातील वैर सगळ्यांनाच माहिती आहे. भाजप सोडल्यापासून एकनाथ खडसे हे सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रहार करत आहेत. आता पुन्हा एकदा खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीरपणे टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंना जनाब असे म्हटले होते. त्यावर एकनाथ खडसे यांनी तीव्र शब्दात टीका केली आहे. हिंदुत्व ज्यांच्याकडून शिकलो त्यांना जनाब संबोधणं चुकीचं असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मान्य नसावं, असा टोला त्यांनी लगावला आहे. पंतप्रधान मोदीजी यांनी बाळासाहेबांबद्दल आदराची भाषा वापरली आहे, पण फडणवीस यांच्याकडून वारंवार वक्तव्य जे होत आहेत ते नैराश्यातून होत आहेत, असेही खडसे यांनी म्हटले आहे. सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे मात्र अशाप्रकारे वक्तव्य करणे चुकीचे आहे अशी टीकाही एकनाथ खडसे यांनी केली आहे.

Updated : 22 March 2022 10:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top