Home > Max Political > भोंगे काढण्यावरून मनसेला दणका, नाशिक पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय

भोंगे काढण्यावरून मनसेला दणका, नाशिक पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय

राज्यात भोंग्यांवरून राजकारण तापले आहे. त्यातच नाशिक पोलिस आयुक्तांनी भोंगे काढण्यावरून मोठा निर्णय घेतला आहे.

भोंगे काढण्यावरून मनसेला दणका, नाशिक पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय
X

राज ठाकरे यांच्या सभेनंतर राज्यात भोंग्यांवरून राजकारण तापले आहे. त्यातच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यापार्श्वभुमीवर नाशिक पोलिस आयुक्तांनी भोंगे लावून हनुमान चालिसा वाजवणारांना मोठी चपराक लगावली आहे.

राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंगे काढण्यावरून इशारा दिला होता. तर मशिदीवरील भोंगे काढले नाहीत तर मशिदींसमोर हनुमान चालिसा पठन करण्यात येईल असा इशारा दिला होता. त्यावरून राज्याचे राजकारण तापले आहे. त्यातच राज ठाकरेंवर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठवली आहे. मात्र यापार्श्वभुमीवर नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी मोठी मोठा निर्णय घेतला आहे.

राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढा अन्यथा मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा पठन करण्याची घोषणा केली होती. त्यावर राज्यभरातून सडकून टीका करण्यात आली. तर हा धार्मिक तेढ निर्माण करून जातीय दंगली घड़वण्याचा डाव असल्याची टीका करण्यात आली. त्यानंतर आता नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी मशिदींसमोर हनुमान चालीसा पठन करण्याच्या तयारीत असणाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे.

काय आहे आदेशात-

  • कोणत्याही धार्मिक स्थळावर भोंगे लावण्यासाठी त्याची परवानगी घेणे बंधनकारक असेल. तसेच विनापरवाना भोंग्यांवर कारवाई करण्यात येईल.
  • अजान सुरू असताना मशिदींपासून शंभर मीटर अंतराच्या आत हनुमान चालीसा पठन करण्यात येणार नाही.
  • ज्यांना हनुमान चालीसा म्हणायची असेल त्यांनी मशिदीपासून 100 मीटर अंतराच्या बाहेर हनुमान चालीसाचे पठन करावे.
  • ध्वनीप्रदुषणाविषयी नियमाचे पालन करणे सर्वधर्मीयांना बंधनकारक असेल.
  • भोंगे लावण्याच्या नावाखाली कोणीही धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना 4 महिने तुरूंगवास आणि 6 महिने तडीपार करण्यात येईल, असे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी सांगितले.

पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी काढलेल्या आदेशाची नाशिक शहरात मोठी चर्चा सुरू आहे. त्यापार्श्वभुमीवर पोलिस आयुक्तांनी काढलेल्या आदेशानंतर मनसेने भोंग्यांसाठी सर्वधर्मीयांनी परवानगी घेण्याच्या आदेशाचे स्वागत केले आहे.



Updated : 18 April 2022 6:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top