Home > Max Political > सर्वपक्षीय बैठक: पावणे तीन तासाच्या बैठकीत मोदींची 8 मिनिटं हजेरी...

सर्वपक्षीय बैठक: पावणे तीन तासाच्या बैठकीत मोदींची 8 मिनिटं हजेरी...

सर्वपक्षीय बैठक: पावणे तीन तासाच्या बैठकीत मोदींची 8 मिनिटं हजेरी...
X

उद्यापासून 19 जुलैला संसदेचं पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज संसदीय कार्य मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला विरोधी पक्षातील नेते उपस्थित होते.

पावसाळी अधिवेशना दरम्यान संसदेचं कामकाज सुरळीतपणे चालावं. या उद्देशाने ही बैठक बोलावली होती. सर्व पक्षांचं विविध मुद्द्यांवर मत जाणून घेऊन संसदेचं कामकाज सुरुळीत पणे चालण्यासाठी ही बैठक महत्त्वाची होती. ही बैठक सुमारे पावणे तीन तास चालली. मात्र, ही बैठक ज्या कारणांसाठी बोलावली होती. ते ऐकूण घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी च या बैठकीला नव्हते. मोदी शेवटचे आठ मिनिटं या बैठकीला हजर होते.

त्यामुळं विरोधी पक्षांनी ही बैठक फक्त औपचारिकता म्हणून बोलावली होती का? असा उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्व पक्षीय नेत्यांचं मत जाणून घ्यायला वेळ नाही का? असा सवालही काही पत्रकारांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. सरकार या अधिवेशनात साधारणपणे 30 विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. त्या पैकी 17 विधेयकं नवीन आहेत.

विरोधक कोणत्या मुद्द्यावर आक्रमक होतील?

महागाई, कोरोना विरुद्धच्या लढ्यात आलेलं अपयश, लसीकरण, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती, परराष्ट्र धोरण, शेतकरी आंदोलन, राफेल यासारख्या मुद्द्यांवर विरोधक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.

बैठकीला कोण आहे उपस्थित?

राजनाथ सिंह, पीयूष गोयल, प्रल्हाद जोशी, मल्लिकार्जुन खड़गे, अधीर रंजन चौधरी, आनंद शर्मा, संजय राउत, पशुपति पारस, अनुप्रिया पटेल, रामगोपाल यादव, त्रुची शिवा, टीआर बालू, हरसिमरत कौर बादल, डेरेक ओ ब्रायन, सुदीप बंधोपाध्याय, संजय सिंह हे नेते उपस्थित आहेत.

Updated : 18 July 2021 3:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top