Home > Max Political > प्रकाश आंबेडकरांनी मविआ बैठकीत मांडलेल्या मुद्द्यांवर नाना पटोलेंनी दिली माध्यमांशी बोलताना माहिती

प्रकाश आंबेडकरांनी मविआ बैठकीत मांडलेल्या मुद्द्यांवर नाना पटोलेंनी दिली माध्यमांशी बोलताना माहिती

प्रकाश आंबेडकरांनी मविआ बैठकीत मांडलेल्या मुद्द्यांवर नाना पटोलेंनी दिली माध्यमांशी बोलताना माहिती
X

मुंबई(Mumbai) : जस-जशा लोकसभेच्या निगडणूका जवळ येत आहे तसा सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकांनाही निवडणुकीचा ध्यास लागला आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचा खपका लावला आहे. आजही महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे उपस्थित होते. या बैठकीत प्रकाश आंबेडकरांनी मविआ नेत्यांपुढे काही प्रस्ताव मांडले, त्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली आहे

जागा वाटपाच्या संदर्भात कोणताही वाद नाही. ४८ जागा या महाविकास आघाडी एकत्रित लढेल, असेही त्यांनी सांगितले.आम्ही सर्वजण भाजपच्या विरोधात लढायला एकत्र आलो आहोत. प्रकाश आंबेडकर यांनी असं काही म्हटलं नाही. मी त्यांच्या बाजूला होतो. ओबीसी, मराठा आरक्षण या संदर्भातही प्रकाश आंबेडकर यांचा प्रस्ताव आहे. यानंतर जागा वाटपासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असं नाना पटोले म्हणाले.

बैठक पार पडून बाहेर आल्यानंतर पटोले माध्यामांशी बोलताना म्हणाले की, नुकत्याच झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक भूमिका मांडली आहे. त्याचबरोबर ते असंही म्हणाले की, जागा वाटपासंदर्भात अजुनही ठोस निर्णय या बैठकीत झालेला नाही, काही उर्वरीत मुद्दे राहिले आहेत ज्यावर तिन्ही पक्षांच्या अंतर्गत चर्चा होणार आहेत.

Updated : 2 Feb 2024 2:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top