Home > Max Political > मनसेच्या मुस्लीम पदाधिकाऱ्याचा राजीनामा

मनसेच्या मुस्लीम पदाधिकाऱ्याचा राजीनामा

मी २००९ पासून पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम केले, पण...-मनसेच्या मुस्लीम पदाधिकाऱ्याचा राजीनामा

मनसेच्या मुस्लीम पदाधिकाऱ्याचा राजीनामा
X

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यादिवशी मुंबईत मेळावा घेतला होता.राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची आक्रमक भूमिका घेतली.भाषणात मशिदीवरील भोंगे न उतरवल्यास आम्ही तिथे मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता.राज ठाकरे यांच्या या विधानावरुन अनेक आरोप प्रत्यारोप झाले.याच मुद्यावरुन मुस्लीम पदाधिकाऱ्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.त्याने पत्राद्वारे आपली नाराजी जाहिर केली आहे.

पुण्यातील वॉर्ड क्रं ८४ आणि प्रभाग क्रं १८ मधील मनसेचे शाखा अध्यक्ष मजिद शेख या पदाधिकाऱ्याने राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्यासंबंधी केलेल्या विधानानंतर राजीनामा दिला.मागील दिवसांपासून बेरोजगारी,महागाई,शिक्षण यांसारखे विषय असताना हे मुद्दे सोडून जात धर्म या विषयावर भर दिला जात आहे.या कारणास्तव मी कोणाच्याही दबावाखाली न येता स्वच्छेने राजीनामा देत असल्याची माहिती माजीद अमीन शेख यांनी पत्रात दिली आहे.

अमीन शेख हे २००९ पासून मनसे पक्षात काम करत आहेत.ते शाखा अध्यक्ष आहेत.त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या प्रभागात हिंदू-मुस्लीम एकत्रित राहतात.पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे.मात्र गुडीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये नाराजी असून त्यामुळे त्यांनी शहर अध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष यांच्याकडे राजीनामा दिला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राजीनाम्यासंबंधी बोलताना सांगितलं की, "त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असल्याची शक्यता आहे. आमचे वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्याशी चर्चा करतील. काही लोक गैसमज करुन देतात त्यातून हे झालं असावं. पण यातून मार्ग निघेल".

Updated : 5 April 2022 6:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top