Home > Max Political > शरद पवार गटाकडून खा. सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी दाखल...!

शरद पवार गटाकडून खा. सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी दाखल...!

शरद पवार गटाकडून खा. सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी दाखल...!
X

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातून खा. सुप्रिया सुळे 'तुतारी फुंकणारा माणूस' या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. या निवडणूकीचा उमेदवारी अर्ज आज विधान भवन येथे खा.शरद पवार व त्यांच्यावर नितांत प्रेम करणारी जनता, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या साक्षीने दाखल केला.

बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आशीर्वाद, शुभेच्छा, अतूट विश्वास आणि भरघोस पाठबळ यांच्या जोरावर मला पुन्हा या मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळेल हा विश्वास आहे.नमायबाप जनतेची सेवा, महिला, शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचा सन्मान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम बुलंद राखण्यासाठी मी लढत आहे. या लढतीत मायबाप जनता माझ्या सोबत राहिल, याची मला खात्री आहे असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबत काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख व आमदार सचिन अहिर, माजी मंत्री व आमदार विश्वजित कदम, खासदार व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे, आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप, आमदार अशोक पवार, माजी आमदार जयदेव गायकवाड, युगेंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, दौंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, रामभाऊ टुले यांच्यासह महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Updated : 18 April 2024 9:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top