Home > Max Political > 'जेवढा तुम्ही चिखल उडवणार तेवढं कमळ उगवणार' : मोदींचा विरोधकांवर पलटवार

'जेवढा तुम्ही चिखल उडवणार तेवढं कमळ उगवणार' : मोदींचा विरोधकांवर पलटवार

मोदी- अदानी संबधावरुन पहिल्या दिवसापासून संसद दणाणत असली तरी लोकसभेपाठोपठच राज्यसभेतही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अदानी आरोपांवरुन उत्तर दिले नाही. पण विरोधी पक्षाने ‘मोदी-अडाणी,’ ‘भाई-भाई’ घोषणांनी राज्यसभा दणाणून सोडली होती, यावरून पंतप्रधान मोदींनी विरोधकांना ‘जेवढा तुम्ही चिखल उडवणार तेवढं कमळ उगवणार’, असं म्हणत पलटवार केला आहे.

जेवढा तुम्ही चिखल उडवणार तेवढं कमळ उगवणार : मोदींचा विरोधकांवर पलटवार
X

मोदी- अदानी संबधावरुन पहिल्या दिवसापासून संसद दणाणत असली तरी लोकसभेपाठोपठच राज्यसभेतही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अदानी आरोपांवरुन उत्तर दिले नाही. पण विरोधी पक्षाने 'मोदी-अडाणी,' 'भाई-भाई' घोषणांनी राज्यसभा दणाणून सोडली होती, यावरून पंतप्रधान मोदींनी विरोधकांना 'जेवढा तुम्ही चिखल उडवणार तेवढं कमळ उगवणार', असं म्हणत पलटवार केला आहे.अदाणी समुहावरील 'हिंडेनबर्ग रिसर्च'च्या अहवालावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ सुरु आहे. आज ( ९ फेब्रुवारी ) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर दिलं.


देशाच्या विकासाचे जे मुद्दे त्यांनी अदानीचा उल्लेख टाळून लोकसभेत दिले ते मुद्दे पुन्हा सांगत कॉंग्रेसवर टीका केली. नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्ला करत कलम ३५६ च्या गैरवापराची आठवण करुन दिली. "आमच्यावर राज्यांना त्रास देत असल्याचा आरोप करण्यात येतो. पण, विरोधी पक्षात बसलेल्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर कसा केला, याचा सर्वांना दाखला देतो. इतिहास काढून पाहा कोणता पक्षा होता? आणि कोण सत्तेत बसलं होतं? ज्यांनी कलम ३५६ चा सर्वात जास्त दुरुउपयोग केला. काँग्रेसने ९० वेळा निवडून आलेली सरकार पाडली. तर, पंतप्रधान इंदिरा गांधींनी ५० वेळा सरकार पाडलं," असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं.


"केरळमध्ये डाव्या विचारसारणीचे सरकार निवडून आलं होतं. ते पंडित जवाहरलाल नेहरुंना आवडलं नाही; आणि सरकार पाडलं. तामिळनाडूमधील एमजीआर आणि करुणानिधी यांचंही सरकार पाडण्यात आलं होतं," असंही मोदींनी सांगितलं. कोणत्याही कार्यक्रमात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावाचा उल्लेख झाला नाहीतर काहींच्या डोक्यावरील केसं उभं राहतात. आमच्याकडून कधीतरी चुकून नाव राहिलं गेलं असेल. ते आम्ही ठिक करु शकतो. कारण, ते देशाचे पहिले पंतप्रधान होते. मात्र, त्यांच्या वारसातील कोणत्याही व्यक्तीला नेहरूंचं आडनाव लावण्यास का भिती वाटते. का नेहरुंचं आडनाव लावण्यास लाज वाटते", असा टोला पंतप्रधानांनी राहुल गांधींना लगावला आहे.

Updated : 9 Feb 2023 2:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top