Home > Max Political > राम मंदिर उभारणीसाठी मोदींनी काहीही केलं नाही – सुब्रमण्यम स्वामी

राम मंदिर उभारणीसाठी मोदींनी काहीही केलं नाही – सुब्रमण्यम स्वामी

राम मंदिर उभारणीसाठी मोदींनी काहीही केलं नाही – सुब्रमण्यम स्वामी
X

आगामी लोकसभा निवडणूकांच्या आधी अयोध्येतील राम मंदिर पूर्ण करण्याचा केंद्रातील मोदी सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी युद्धपातळीवर राम मंदिराचं कामंही सुरूय. अशातच भाजपचे अभ्यासू नेते, सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट केलंय. स्वामी यांच्या या ट्विटमुळं पुन्हा मंदिर प्रश्नावर चर्चा सुरू झालीय.

उत्तर प्रदेशमधल्या अयोध्या इथं राम मंदिराचं निर्माणकार्य सुरूय. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या निर्मिती समितीचे प्रमुख नृपेंद्र मिश्र यांनी आधीच माहिती दिली होती की, “ डिसेंबर २०२३ पर्यंत राम मंदिराच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण होईल. मंदिराचं बांधकाम हे तीन टप्प्यात पूर्ण केलं जाणार आहे. त्यातल्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्यनंतर भक्तांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

आता भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामींनी राम मंदिराच्या बांधकामासंदर्भात एक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की, २०२५ पूर्वी राम मंदिराचं संपूर्ण बांधकाम पूर्ण होणं शक्य नाही. मंदिराचे जे काही काम पूर्ण होईल ते तळमजल्याचं असेल आणि शामियान्याखालच्या भागात प्रस्तावित गर्भगृहात भगवान रामाची मूर्ती ठेवली जाईल. या मंदिर उभारणीसाठी मोदींनी काहीही केलेलं नाही, आणि त्याचं श्रेय घेणं वाईट असल्याची टीका स्वामी यांनी ट्विटद्वारे केलीय.

एएनआय या वृत्तसंस्थेनं उद्धव ठाकरे यांनी जळगाव मधील सभेत केलेल्या वक्तव्याची माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटरवर टाकली होती. त्या माहितीला प्रतिसाद देतांना सुब्रमण्यम स्वामी यांनी हे ट्विट केलंय.


Updated : 11 Sep 2023 12:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top