Home > Max Political > Sharad pawar Retirement : शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयावर मनसेची पहिली प्रतिक्रीया

Sharad pawar Retirement : शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयावर मनसेची पहिली प्रतिक्रीया

शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला आहे. त्यावर मनसेने प्रतिक्रीया दिली आहे.

Sharad pawar Retirement : शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयावर मनसेची पहिली प्रतिक्रीया
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी आपण सक्रीय राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. त्याबरोबरच यापुढे मी पक्षाचा अध्यक्ष असणार नाही, असंही म्हटलं. त्यामुळे कार्यकर्त्यांनी भावनिक होत निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र मला दोन तीन दिवसांचा वेळ द्यावा, असं शरद पवार यांनी अजित पवार यांच्या मार्फत कार्यकर्त्यांना सांगितले. मात्र या घटनेवर मनसेचे आमदार राजू पाटील (MNS leader Raju patil) यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

आमदार राजू पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पदावरून निवृत्त होणार असल्याचे सांगितले. (Sharad pawar Retirement) हा त्यांच्या पक्षांतर्गतचा विषय आहे. पण त्यांचं वय व आजार पाहता यासाठी कुठेतरी थांबायला हवं यासाठी ते थांबले असावेत, असं मत व्यक्त केले. तसेच त्यांच्यावरती भाष्य करणे एवढा मोठा मी नाही. मात्र ज्या हालचाली चालल्या होत्या जे ऐकायला येत होते अफवा असतील कदाचित त्या कुठेतरी थांबायला हव्यात. त्यामुळे शरद पवार यांनी मास्टर स्ट्रोक खेळलेला असेल. हा त्यांचा मास्टर स्ट्रोक आहे. तो अनेक अंगानी असू शकतो. ते पवार साहेब आहेत. त्यांच्याबद्दल काय बोलणार? असे सांगत राजू पाटील यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली.



Updated : 3 May 2023 2:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top