Home > Max Political > लवंगी वाजली तरी पुरे, औरंगाबाद येथील सभेआधी मनसेचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना टोला

लवंगी वाजली तरी पुरे, औरंगाबाद येथील सभेआधी मनसेचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना टोला

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यापार्श्वभुमीवर मनसेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सभेआधी खोचक टोला लगावला आहे.

लवंगी वाजली तरी पुरे, औरंगाबाद येथील सभेआधी मनसेचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना टोला
X

भाजपसह राज ठाकरे यांनीही मुख्यंमत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे आजच्या सभेत नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर शिवसेनेने तोड कडाडणार अशा प्रकारची बॅनरबाजी केली आहे. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करून खोचक टोला लगावला आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, तत्वासाठी सत्तेवर लाथ मारणारे मा.बाळासाहेब कुठे आणि एका राज्यसभेसाठीच्या जागे साठी एम आय एम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे आमचे नंबर वन कुठे. असो आज संभाजी नगर मध्ये तोफ धडाडणार अस म्हणतात पण लवंगी वाजली तरी पुरे, असा खोचक टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सभेपुर्वी लगावला आहे.

उध्दव ठाकरे काय बोलणार?

मनसेच्या औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, मुख्यंमत्री उध्दव ठाकरे म्हणतात मी संभाजीनगर म्हणतो. मग नामांतराची गरज काय? पण उध्दव ठाकरे तुम्ही महात्मा गांधी आहात का? असा सवाल करत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेवर टीका केली होती. त्यामुळे औरंगाबादच्या सभेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना आणि राज ठाकरे यांना उत्तर देणार का? असा सवाल चर्चेत आहे.

औरंगाबादच्या पाणीप्रश्नावर मुख्यमंत्री काय उत्तर देणार?

गेल्या काही वर्षांपासून औरंगाबादचा पाणीप्रश्न तीव्र होत चालला आहे. तर सध्या हा प्रश्न प्रचंड तापला आहे. त्यामुळे पाणीप्रश्नावरून औरंगाबादमध्ये महापालिकेतील सत्तेत असलेल्या शिवसेनेची सर्वच पक्षांनी नाकाबंदी केली आहे. तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादमध्ये जलआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली होती. तर पाण्याच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेनेही आक्रमक भुमिका घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत पाणीप्रश्न तातडीने सोडवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे औरंगाबाद येथील सभेच्या माध्यमातून विरोधकांना काय उत्तर देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Updated : 8 Jun 2022 4:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top