Home > Max Political > शरद पवार – मुख्यमंत्र्यांची बैठक, मतभेदाच्या मुद्द्यांवर चर्चा?

शरद पवार – मुख्यमंत्र्यांची बैठक, मतभेदाच्या मुद्द्यांवर चर्चा?

शरद पवार – मुख्यमंत्र्यांची बैठक, मतभेदाच्या मुद्द्यांवर चर्चा?
X

महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी भेट घेतली. विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. पण त्याहीपेक्षा गेल्या काही दिवसात सरकारमधील असमन्वयाच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याची शक्यता आहे. तसेत इतरही अनेक मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडी चौकशी, टाटा कॅन्सरग्रस्तांकरीता शरद पवारांच्या हस्ते वाटप केलेल्या सदनिकांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी दिलेली स्थगिती, राज्यात कोरोनाचे निर्बंध पुन्हा कडक करण्याच्या निर्णयामुळे छोटे व्यावसायिक, दुकानदार यांच्यात निर्माण झालेल्या नाराजीचा मुद्दा या सर्व विषयांवर या बैठकीत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. शरद पवार – मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी मंगळवारी संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते.

Updated : 30 Jun 2021 2:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top