Home > Max Political > "मोदी देशाचे पुन्हा पंतप्रधान होऊ शकणार नाहीत", प्रकाश आंबेडकरांचे सूचक वक्तव्य...

"मोदी देशाचे पुन्हा पंतप्रधान होऊ शकणार नाहीत", प्रकाश आंबेडकरांचे सूचक वक्तव्य...

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय भवितव्यावर मोठे राजकीय विधान केले आहे. आंबेडकर नेमके काय म्हणाले आहेत...ते नक्की वाचा...

मोदी देशाचे पुन्हा पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचे सूचक वक्तव्य...
X


वंचित बहुजन आघाडीला मुस्लीम समुदायाने साथ दिली तर २०२४ मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा देशात पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते मुंबईत मुस्लीम मौलवी आणि उलमा यांच्याबरोबरच्या बैठकीत ते बोलत होते. मुस्लिम समाजाची ताकत ही देशभरात मोठ्याप्रमाणात आहे. त्यांनी जर ठरवले तर २०२४ च्या लोकसभा निवडणूकीनंतर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावर विराजमान होणार नाहीत. तुम्ही हे लिहून ठेवा आणि ही मुस्लिम समाजाची ताकत आहे. यावेळी बदलाची Best मुस्लिमांमधून येईल. असे सुद्धा आंबेडकर यावेळी म्हणाले.

२०२४ मध्ये मुस्लिम समाज कोणत्याही परिस्थितीत भाजपाला मतदान करणार नाही, हा सर्वांना विश्वास असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. देशात धार्मिक तेढ वाढवणारी तसेच सामाजिक शांतता भंग करणारी परिस्थिती निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवार मुस्लिम मौलवी आणि उलमा यांच्याबरोबर महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत 'मुस्लिम समाजाची सध्याच्या राजकीय व्यवस्थेतील पिळवणूक, मुलभूत समस्या आणि संवैधानिक उपाय' या अनुषंगाने उपस्थितांशी संवाद साधला. तसेच पैगंबर बिल संदर्भातही चर्चा झाली, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत दिली.

Updated : 25 Feb 2023 5:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top